जयअनंत महोत्सव २०२३ चे रंगारंग उदघाटन.

 जयअनंत महोत्सव २०२३ चे रंगारंग उदघाटन.

--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकुर 

--------------------------------------------

  मा.मंत्री देशमुख,आ.श्वेता महाले, ॲड.नकुल देशमुख व मान्यवरांची उपस्थिती.

रिसोड - जय अनंत महोत्सव २०२३ वर्ष तिसरे, उत्सव महाराष्ट्रीयन संस्कृतीचा चे उद्घाटन माजी मंत्री माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेत, चिखलीच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते व भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुलदादा देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.

ॲड. नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेला.विभागात लोकप्रिय असलेला जय अनंत महोत्सव 2023 चा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 102 स्थानिक महिला बचत गट, स्थानिक समूह, व्यावसायिक यांची विविध वस्तू विक्री व खाद्यपदार्थांच्या स्टॉल सहित, शिवकालीन शस्त्रगार, विविध नृत्यकला, किर्तन प्रवचन, दिंडी, विविध संत परंपरा, भातुकलीचा खेळ, अंगावरती शहारे आणणारे शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण, जादूचे खेळ सहित अनेक मनोरंजनाच्या प्रसंगासह यावर्षी या रंगारंग कार्यक्रमाची शुभारंभ झाला. यावेळी उद्घाटनानंतर माजी मंत्री अनंतरावजी देशमुख, आमदार श्वेता महाले, भाजप नेते नकुल देशमुख, जयश्रीताई देशमुख,चैतन्य देशमुख,सौ.अमृताताई,विभागीय कृषी संचालक किसनराव मुळे,जिल्हा कृषी अधीक्षक हरिफजी शहा

रिसोडच्या तहसीलदार सौ. प्रतिक्षा तेजनकर,रिसोडच्या नगराध्यक्ष सौ.विजयमालाताई कृष्णाजी आसनकर,रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदार देवेंद्रजी ठाकूर,रिसोड नगर परिषद मुख्यधिकारी सतिशजी शेवदा सहित मान्यवर मंडळी यांनी जयंत महोत्सवाच्या सर्व स्टॉलची पाहणी केली सोबतच सादर कर होत असलेल्या सर्व कला सादरीकरण याची पाहणी केली. सर्व मान्यवरांनी विविध खाद्यपदार्थ कला सादरीकरण व गुणवत्तात्मक दर्जाच्या वस्तू विक्रीची कौतुक करून आढावा घेतला. महोत्सवात सादर होणाऱ्या प्रत्येक मनोरंजनात्मक व अंगावर शहारे आणणाऱ्या व इतर सर्व कला नाटिका सादरीकरणाचे महोत्सवात प्रचंड संख्येने येणाऱ्या परिवारांनी भरभरून कौतुक केले. तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलेली काटेकोर व्यवस्था याचेही कौतुक केले. अशाप्रकारे जयंत महोत्सव 2024 वर्ष तिसरीचे उद्घाटन संपन्न झाले व मोठ्या प्रमाणात विभागातील जिल्ह्यातील व तालुक्यातील परिवारांनी आपल्या सदस्यासहित भेट देत आनंदी क्षणाचा अनुभव घेतला

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.