गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास ०२ अग्नीशस्त्रांसह शिताफीने अटक. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी.

गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास ०२ अग्नीशस्त्रांसह शिताफीने अटक. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
कराड प्रतिनिधी 
वैभव शिंदे
-----------------------------------------

 कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना व उपनिरीक्षक श्री डांगे यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की दादा पटेल रा. वाघेरी ता.कराड हा गावठी पिस्टल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने करवडी फाटा येथे थांबून आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती बातमी डांगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सूर्यवंशी यांना कळवून त्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व तयारीनिशी सापळा रचून दिनांक 23/11/ 2023 रोजी रात्री 7 वा. चे सुमारास करवडी फाटा येथे  गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत असलेल्या इसमास तो पळून जात असतानाच झडप घालून ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव दादा पटेल उर्फ युसुफ दिलावर पटेल, वय 45 वर्ष रा.वाघेरी ता.कराड असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला पॅन्ट मध्ये खोचलेल्या दोन गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला. सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल दोन अग्निशस्त्रांसह मिळून आलेला असून भा.शस्त्र.का.क 3/25 प्रमाणे दखलपात्र व गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. 
       सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग, मा श्री. विवेक लावंड व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राज पवार हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.