लाखो भाविकांच्या उपस्थितीत पट्टणकोडोली च्या विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न. सुमारे 75 टन भांडाऱ्याची उधळण करण्यात आली.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पट्टणकोडोली च्या विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न. सुमारे 75 टन भांडाऱ्याची उधळण करण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं कालपासून श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस सुरुवात झाली आहे,काल खेलोबा वाघमोडे उर्फ फरांडे बाबा यांचं आगमन झाले आज यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला,आज सकाळी गावातील गावडे,पाटील,मगदूम,चौगुले,जोशी, कुलकर्णी,महालदार ,पुजारी या प्रमुख मनकर्यांनी फरांडे बाबांना आलिंगन देऊन भाकणुकी साठी आमंत्रण दिल,यानंतर दुपारी 2.30 वाजता फरांडे बाबानी हेडाम नृत्य करण्यास सुरुवात केली.यावेळी खारीक खोबरे,लोकर व सुमारे 75 टन भांडाऱ्याची उधळण करण्यात आली हेडाम नृत्य करत फरांडे बाबानी मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरासमोर येऊन भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला फरांडेबाबांच्या भाकणुकीत यंदा रोहीणी नक्षत्र बरसेल, पाऊसकाळ बरसेल,महागाई शिगेला पोहचेल.
राजकारणात प्रचंड अस्वस्तथा होऊन उलथापालथ होईल.आणि भगव्याच राज्य येईल
समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल,बळीराज्यास सुखाचे दिवस येतील
जगात भारत देश महासत्ता बनेल
भारतीय संशोधन जगात कौतुकास्पद पात्र होईल,कोणी कोणाचे राहणार नाही
रोगराई सर्वसामान्य होईल, कांबळ्याचे महत्व जगात वाढुन सेवेकऱ्यास पुण्यप्राप्त होईल.अशी भविष्यवाणी केली.यानंतर फरांडे बाबांनी मंदिरात जाऊन विठ्ठल बिरदेवांचे दर्शन घेतले.यानंतर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या गादीवर विराजमान झाले यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी महाराष्ट्र,कर्नाटक आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश,गोवा या राज्यातून 8 ते 10 लाख भाविकांची उपस्थिती होती,भंडाऱ्याच्या उधळणीने गावाला सोन्याचे रूप आले आहे.
Comments
Post a Comment