जिल्हा परिषद,कोल्हापूर सरळसेवा पदभरती 2019 व 2021 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा परत करणेबाबत.

 जिल्हा परिषद,कोल्हापूर सरळसेवा पदभरती 2019 व 2021 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा परत करणेबाबत.

------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

------------------------------------

 जिल्हा परिषदेच्या गट क मधील 14 संवर्गातील माहे मार्च 2019 मधील जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट,2021 मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची चार संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपूर्ण भरती प्रक्रिया शासन निर्णय दि.21 ऑक्टोंबर 2022 अन्वये रद्द करण्यात आली असून जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्यात येणार आहेत.

 उपरोक्त परीक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि.05/09/2023 पासून सुरु करण्यात आली आहे. तेव्हा मार्च 2019 व ऑगस्ट 2021 च्या अनुषंगाने सरळसेवा पदभरती करीता अर्ज केलेल्या उमेदवारांनी सदर लिंक वापरुन आपली वैयक्तिक माहिती बिनचुक भरणेचे अवाहन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे. तसेच सदरची लिंक जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या https://www.zpkolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तेव्हा उमेदवारांनी भरलेली माहितीची पडताळणी करुन जिल्हा परिषद,कोल्हापूर चे सरळसेवा पदभरती करीता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे परीक्षा शुल्क अलहिदा आदा करणेची कार्यवाही करणेत येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.