बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दहा लाख रुपये शासकीय योजनेतील पेन्शन 170 लाभार्थ्यांना वाटप!

 बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दहा लाख रुपये शासकीय योजनेतील पेन्शन 170 लाभार्थ्यांना वाटप!


-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

वळीवडे येथे आज श्री.प्रकाश शिंदे मा.उपसरपंच यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत 10 लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन 170 लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी कॅम्प द्वारे गणेश मंदीर वळीवडे येथे आज मंगळवार दि.9/11/2023 रोजी वाटप करण्यात आली.

 संजय गांधी,श्रावण बाळ,वृध्दापकाळ, इंदिरा गांधी,अपंग साहाय्यता,इत्यादी शासनाच्या योजनांव्दारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा मार्केट यार्ड,कोल्हापूर येथे पेन्शन दिली जाते.बँकेमध्ये जाण्यासाठी वेळेमध्ये भेटत नसल्याने मिळेल त्या वाहनाने किंवा रिक्षा मधून तर वयस्कर पेन्शन धारका सोबत घरातील एका व्यक्तीला जावे लागते. जाण्यासाठी रिक्षावाला 100 ते 150 रूपये घेतो.

    तसेच बँकेच्या दारामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने तो पेन्शन धारक सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेला की संध्याकाळी 4 ते 5 वाजताच घरी येतो.पेन्शनधारकांची व घरातील व्यक्तीची काळजीपोटी परवड होऊ नये व बँक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून श्री.प्रकाश शिंदे (मा.उपसरपंच) वतीने वळीवडेतील पेन्शन धारकांना आज वळीवडे येथील गणेश मंदीर हाॅल या ठिकाणी कॅम्प व्दारे व आजारी पेन्शन धारकांना घरी जाऊन पेन्शन वाटप करण्यात आली.

दिपावली सणा अगोदर पेंन्शन मिळाल्याने लाभार्थी मधून समाधाण व्यक्त करण्यात येत आहे 


     आजारी 7 पेन्शन लाभार्थी यांना घरी जाऊन लाभ देण्यात आला.

        श्री.प्रकाश शिंदे (मा.उपसरपंच)यांच्या पुढाकाराने आज 170 लाभार्थांना पेन्शन चे वाटप करण्यात आले.

     यावेळी श्री.प्रकाश शिंदे (मा.उपसरपंच), बँकेचे शाखाअधिकारी श्री.एस.आर.पाटील,कर्मचारी श्री.मिलींद प्रभावळकर,श्री.जितेंद्र निळकंठ, श्री.सुनिल केसरकर, तसेच सौ.आरती शिंदे, सुनिता चव्हाण,विठ्ठल सावंत,अभिनंदन कावले,व लाभार्थी उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.