अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन सोहळा दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न.

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन सोहळा दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न. -------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र पन्हाळा प्रतिनिधी आशिष पाटील ------------------------------------- राज्यभरातील ग्रामीण डॉक्टरांना एकीच्या झेंड्याखाली आणून त्याच्या न्यायहक्कासाठी व्यवस्थेशी सतत संघर्ष करुन ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्राला संरक्षण, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देणाऱ्या अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या सातवा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे सर यांच्या पुढाकारातून बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऎतिहासीक नगरी कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा पर्यटन ठिकाणी ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील २०० हून अधिक डॉक्टर्स बांधवांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पन्हाळा येथील बसस्थानकाच्या पाठीमागील न.प. सांस्कृतीक भवनात सकाळी १२ वाजता या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.रुपालीताई धडेल ह्यानी केले तर...