सिद्धिविनायक लॅबोरेटरीच्या वर्धापन दिनानिमित्त बिद्री येथे आयुष्यमान भव VHNC मार्फत किशोरवयीन मुला मुलींची आरोग्य तपासणी
सिद्धिविनायक लॅबोरेटरीच्या वर्धापन दिनानिमित्त बिद्री येथे आयुष्यमान भव VHNC मार्फत किशोरवयीन मुला मुलींची आरोग्य तपासणी.
------------------------------------------
विजय कांबळे
बिद्री प्रतिनिधी,
-----------------------------------------
साधारणपणे १२ ते १८ या वयात मूले मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नाजूक काळातून जात असतात.वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते.योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची वजन आणि स्नायूंची शक्ती वाढते.जेव्हा किशोरवयीन मुलांची हिमोग्लोबिनची (HB) पातळी कमी होते तेव्हा त्याला अनेमिया असे म्हणतात.अनेमिया हा अनेक प्रकारचा असतो.रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे,फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे, अनुवंशिक कारणांमुळे ही हा आजार होतो.म्हणून किशोरवयीन मुलांनमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन त्याच्या समस्या बद्दल त्यांना मार्गदर्शन करण्याचे गरजेचे असते.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिद्धीविनायक लॅबोरेटरी यांच्या सौजन्याने वर्धापन दिनानिमित्त आज बिद्री येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी CHO डॉ.घोरपडे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच आरोग्य सेवक श्री,. वायदंडे सर यांनी ही मुलांना होणार्या बदलाबाबत आरोग्य आणि आहार या बाबत माहिती दिली या वेळी डॉ.तानाजी हरेल सर, ग्रामपंचायत सदस्य आण्णासो पोवार, राजेंद्र चौगले,तसेच संतोष गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, संभाजी गायकवाड व सिध्दीविनायक लॅबोरेटरीचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, साक्षी भारमल, अभिलाषा भोसले भावेश्वरी इंग्लिश मिडीयमचे चेअरमन योगेश मोरे सर , प्राचार्या कपले मॅडम, सर्व आशा वर्कर्स व मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment