रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते "प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.

  रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते "प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.

"  रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वागवे ठरणार नाही." असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.

जयवंत प्रतिष्ठान हुमगावचे संस्थापक -अध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री सन्मानीय शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त,मेढा येथील महाविद्यालयात,एन.एस.एस विभाग, जिमखाना विभाग व सातारा येथील बालाजी ब्लड सेंटर यांच्या वतीने, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे व प्रा.प्रमोद चव्हाण व अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्य डॉ. अशोक गिरी सर पुढे म्हणाले की, "

रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते.म्हणूनच आपण मानवतेच्या नात्याने रक्तदान करावे " असे सांगून त्यांनी रक्तदानामुळे इतरांचा फायदा होतोच शिवाय आपल्याही हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय , हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते.यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.अशी माहीती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.डॉ.संग्राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले.या रक्तदान शिबिरावेळी एकूण एक्कावन रक्तदात्यांनी रक्तदान केले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाचे वतीने,रक्तदात्यांना विविध वस्तू भेट देण्यात आल्या.यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.डॉ.संजय भोसले यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.