करवीर मध्ये ४३८ उमेदवारी अर्ज.
करवीर मध्ये ४३८ उमेदवारी अर्ज.
--------------------------------------------
करवीर प्रतिनिधी/ रोहन कांबळे
--------------------------------------------
करवीर- तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम ६ ऑक्टोंबर पासून सुरू झाला आहे. या दहा ग्रामपंचायतीच्या एकूण १८ जागांसाठी ४३८ अर्ज दाखल झाले आहेत.लोकनियुक्त सरपंच पदासाठी ७१ अर्ज दाखल झाले.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १६ ते २० ऑक्टोंबर होती. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी द्यावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते.मात्र,त्यांच्या प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्याने दररोज दोन तास मुदत वाढ देण्यात आली होती.२३ ऑक्टोंबरला छाननी, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध तर चिन्ह वाटप २५ ऑक्टोंबरला होणार आहे. मतदान ५ व मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.करवीर मधील १० ग्रामपंचायतीच्या ९८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.सदस्य पदांसाठी ४३८ तर १० सरपंच पदासाठी ७१ अर्ज दाखल झाले आहेत.
Comments
Post a Comment