महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे हस्ते समारोप.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे हस्ते समारोप.
मेढा;- जावली पंचायत समिती येथे 'स्वच्छता ही सेवा' या कार्यक्रमात कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या कार्यक्रमाव्दारे सोमवारी दिनांक 2 ऑक्टोबर २०२३ रोजी जावलीमध्ये स्वच्छ पंधरवडाचा समारोप करण्यात आला.
महात्मा गाधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून जावली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.मनोज भोसले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.स्वच्छ पंधरावडा हा उपक्रम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.आज २ ऑक्टोंबर २०२३ रोजी या उपक्रमाचा समारोप होणार आहे.या उपक्रमाद्वारे गावागावांत स्वच्छतेविषयक श्रमदान करण्याचे आवाहन गट विकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले आहे.स्वच्छ पंधरवडा समारोप कार्यक्रमास पंचायत समिती, जावली सर्व अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment