किसन वीर मध्ये स्वच्छता मोहीम.

 किसन वीर मध्ये स्वच्छता मोहीम.

--------------------------------------

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

--------------------------------------

महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट यांच्या नियोजनानुसार रविवार दि. ०१/१०/२०२३ रोजी पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त  महाविद्यालयाचा परिसर व जय किसान मुलांचे वसतिगृह परिसर इ. भागात "स्वच्छता ही सेवा "या अभियानांतर्गत 'एक तारीख एक तास” या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले.

सुरूवातीला स्वच्छता कर्मचारी संजय देवीया, संजय तारांबळे, वैशाली तारांबळे, स्वयंसेविका कु. दुर्वा हेळकर यांच्या शुभहस्ते टिकाव-फावड्यांचे पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मा. मदनदादा भोसले म्हणाले, महात्मा गांधीजींनी भारताला  स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच सत्य व अहिंसा या तत्त्वांबरोबरच स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने आठवड्यातील दोन तास राष्ट्रसेवेसाठी, स्वच्छतेसाठी दिल्यास  महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही.

त्यानंतर कु. श्रावणी बगाडे हिने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली.

त्यानंतर स्वयंसेवकाचे गट करून महाविद्यालय व वसतिगृह परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमात पत्रकार धनंजय घोडके, प्रशांत डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.