कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाने चिंचमाई देवालय ते वरची गल्ली असा अर्धा किलो मिटरचा रस्ता रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून सजविला होता.
ही सजावट अत्यंत आकर्षक होती. निमित्त होते दसरा महोत्सवाचे, या वर्षीच्या पाटीलकीचे मानकरी बळवंत लहू पाटील यांच्याकडून कळस काढण्याचे कार्य झाले. परंपरेनुसार ग्रामदैवत चिंचमाईची पालखी सवाद्याच्या गजरात इरु दाजी पाटील यांच्या डाग या शेतात नेली जाते.
या ठिकाणी देव पूजारी पाटील,मानकरी व नवरातकरी यांच्याकडून सोन्याच्या झाडाची विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर पालखी देवालयात परत आल्यावर प्रांगणात गावकरी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोने वाटपाचा आनंद उत्सव साजरा करतात.
त्यानंतर देवालयात नऊ दिवस मुक्कामाला असणारे देवाचे मुखवटे कृष्णाजी गणपती पाटील, नारायण गुंडू पाटील व दिनकर विष्णू पाटील यांच्या घरी दिले जातात व पालखी गावात मुक्कामाला ठेवली जाते.
Comments
Post a Comment