समृद्ध शालेय ग्रंथालय हे शाळेचे वैभव ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ झाली पाहिजे

 समृद्ध शालेय ग्रंथालय हे शाळेचे  वैभव  ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ झाली पाहिजे.
*जीवन साळोखे*

------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------
वाचन प्रोत्साहनासाठी आणि शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी शाळाशाळांतून ग्रंथदान उपक्रम राबविणे आवश्यक आहे.समृध्द शालेय ग्रंथालय हेच शाळेचे खरे वैभव आहे. त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अधिक वाचते होवून विद्यार्थ्यांना वाचते करावे," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.

 ते म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे येथे "आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत " हायस्कूल्सना  पुस्तक संच  वाटप करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील होते. प्रमुख उपस्थिती कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ए.आर.खामकर, मंडलिक साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ.राजश्री चौगुले, हळदी हायस्कूलचे मुख्याध्यापक  जी.के. भोसले,सत्संग समूहाचे श्रीकांत पाटील यांची होती.

     वाचन प्रोत्साहन आणि शालेय ग्रंथालय समृद्धी यासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे यांनी दिलेल्या, सुमारे दोनशे दर्जेदार पुस्तकांचे वाटप तालुक्यातील चिखली,कौलगे,खडकेवाडा, बाचणी, सुळकूड, मौजे सांगाव, कसबा सांगाव,आन्नूर, म्हाकवे येथील बारा  हायस्कूल्सना उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावेळी  करण्यात आले.

       प्रारंभी या ग्रंथदान समारंभाचे आयोजक म्हाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.बी. भारमल यांनी उपस्थितांना पुस्तक भेट देवून  सर्वांचे  स्वागत व प्रास्ताविक करून ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व विशद केले.

        आपल्या भाषणात ग्रंथदान उपक्रम अखंड सुरू ठेवणाऱ्या जीवन साळोखे यांनी, वाचन संस्कृती, ग्रंथप्रसार,वाचक संस्था  यांचे महत्त्व विशद करून ते म्हणाले, सतत वाचन केल्याने स्वतःचे अज्ञान आपल्याला समजते.मात्र वाचन न केल्यास, त्याची उपेक्षा केल्यास आपले अज्ञान जगाला कळते. वाचनामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आचार-विचाराला योग्य दिशा मिळते." 

       यावेळी मुख्याध्यापक खामकर,पी.व्ही. पाटील, के.आर.पाटील, इ.नी समयोचित  मनोगते व्यक्त केली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन    युवराज पाटील यांनी केले. आभार  आर.आर.पाटील     यांनी मानले. कार्यक्रमास सर्व संबंधित शाळा  मुख्याध्यापक व स्टाफ उपस्थित होते.कार्यक्रमाचे नेटके संयोजन म्हाकवे इंग्लिश स्कूलच्या स्टाफने केले होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.