शेत जमिनीच्या वादातून हलसवडे मध्ये एकाचा खून.
शेत जमिनीच्या वादातून हलसवडे मध्ये एकाचा खून.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
हलसवडे या गावी शेत जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला असून, खून गर्दी मारामारी या गुन्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आले आहे.
हलसवडे येथील दशरथ कांबळे आणि श्रीमंत कांबळे यांचा शेत जमिनीच्या वाटणीवरून जुना वाद सुरू आहे. आज या वादाचे पर्यावसण जोरदार हाणामारीत झाले. यातील दशरथ कांबळे आणि त्याच्या कुटुंबीयांनी श्रीमंत कांबळे यांच्या घरासमोर जाऊन, धारदार चाकू कोयते आणि काठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात श्रीमंत कांबळे यांच्यावर चाकू आणि कोयत्याने वर्मी वार झाले. तर त्यांच्या मुलावर आणि आणि अन्य एकावर देखील हल्ला झाला. दशरथ कांबळे त्याची मुले आणि एक अल्पवयीन यांच्यावरती खुनाचा आणि गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल झाला असून ,गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.ऐन सणासुदीच्या दिवसात खुनासारख्या भयंकर घटनेमुळे हलसवडे परिसरात खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment