कागल तालुक्यातील व्हन्नुर गावात प्रथमच सुरू झालेल्या सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्रला युनिसेफ ने दिली भेट.
कागल तालुक्यातील व्हन्नुर गावात प्रथमच सुरू झालेल्या सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्रला युनिसेफ ने दिली भेट.
---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कागल प्रतिनिधी
विजय कांबळे
---------------------------------------------
आंतरराष्ट्रीय संस्था युनिसेफ ने कागल तालुक्यातील व्हन्नुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यामध्ये बाल सरपंच साक्षी जाधव व बाल उपसरपंच अश्विनी खणे यांनी युनिसेफ ला गावच्या कामाचा आढावा दिला .यामधे GPDP आराखडा,गावाची भौगोलिक स्थिती, सामाजिक सुरक्षा, बालस्नेही पंचायत व या उपक्रमांतर्गत झालेली कामे व योजनेपासून वंचित घटक अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बालपंचायत आणि ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे युनिसेफच्या प्रमुख देविका देशमुख यांनी कौतुक केले,तसेच गावातील सर्व विभागांची माहिती घेतली आणि तिथे येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व देविका देशमुख यांनी,"व्हन्नुर ला केंद्रस्थानी ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू" असे सांगितले.
यावेळी युनिसेफ चे राज्यसल्लागार प्रमोद कालेकर,युनिसेफ च्या कामिनी कपाडिया, युवा संस्थेकडून सुरेश लुले आणि डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक ललित बाबर,संस्थेच्या संचालिका Adv. प्रभा यादव,अमोल कदम,नीता आवळे,रविना माने,सरपंच पूजा मोरे,उपसरपंच मंगल कोकने ग्रामसेवक मोरेश्वर जंगम ,बालसरपंच साक्षी जाधव, बालउपसरपंच अश्विनी खणे आणि गावातील ग्रामपंचायत व बाल पंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील विविध विभागातील शासकीय कर्मचारी व आसपासच्या गावातील योजनादुत उपस्थित होते.
Comments
Post a Comment