राधानगरी दाजीपूर जंगल सफारी १ नोव्हेंबर पासून होणार सुरु.
राधानगरी दाजीपूर जंगल सफारी १ नोव्हेंबर पासून होणार सुरु.
सर्व निसर्गप्रेमी पर्यटकांचे आकर्षण असलेली राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील दाजीपूर सफारी येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होत आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोंबर सफारी पूर्ण बंद असते. १ नोव्हेंबर पासून सुरु होणारी हि सफारी मे माहिन्या पर्यंत सुरु राहते. ओपन जीप मधून जंगलात फेरफटका मारण्यासाठी राज्यातून पर्यटक येथे भेट देत असतात. विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांचं येथे दर्शन होते. दर मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असून बाकी दिवशी अभयारण्य सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत सुरु असते. स्थानिक ग्रामस्थांच्या ओपन जीप मधून जंगल सफारी घडवण्यात येते. दाजीपूर मधून व राधानगरी मधून जंगल सफारी गाडी उपलब्ध होते. सध्या थंडी व धुक्या मुळे आल्हाददायक वातावरण दाजीपूर भागात असते त्यामुळे आतापासूनच बुकिंग जोरात असलेचे स्थानिक जीप चालक यांनी सांगितले.
Comments
Post a Comment