कोनोली तर्फे असंडोली (ता. गगनबावडा )येथील शाळेत वाढदिवसाच्या निमित्त शालेय पोषण आहार वाटप.

 कोनोली तर्फे असंडोली (ता. गगनबावडा )येथील शाळेत वाढदिवसाच्या निमित्त शालेय पोषण आहार वाटप.

--------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील

-------------------------------------

विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेत अध्यापक श्री दशरथ श्रीपती पाटील यांनी आपली कन्या कुमारी श्रद्धा हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत पूरक आहार म्हणून अंडी व शेंगदाणा चिक्की दिली. श्री दशरथ पाटील हे शाळेत असे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून नवा रुपास येत आहे. त्यांना मुख्याध्यापक श्री डी एम पोवार सर यांचे मार्गदर्शन तसेच अध्यापक श्री.आनंदा गडकर सर, श्री सुहास पाटील सर, श्री आनंदा पाटील सर, पूजा पाटील मॅडम, नंदा जाधव  मॅडम यांचे सहकार्य लाभत आहे . 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.