महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल.

 महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल.

------------------------------------------------------
जयसिंगपूर/प्रतिनिधी
-----------------------------------------------------

एज्युकेशन टु डे च्या 2023 च्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल डे कम बोर्डिंग स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्कूल ठरले. त्याचसोबत उत्कृष्ट शिक्षण संस्थापक म्हणून श्री संजय घोडावत यांनाही सन 2023 चा एज्युकेशन टु डे चा पुरस्कार या कार्यक्रमात प्राप्त झाला.

     एज्युकेशन टुडेने दि 4 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल द ललित, येथे 'महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्ड्स, 2023' या सर्व टॉप स्कूल विजेत्यांचा व उत्कृष्ट शिक्षण संस्थापक यांच्या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. 

   400 हून अधिक शाळांच्या सर्वेक्षण फॉर्ममधून टॉप स्कूल्सची निवड करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची गुणवत्ता व योग्यता , सहशालेय अभ्यासक्रम, क्रीडा शिक्षण, डिजिटल लर्निंग, विद्यार्थ्यांची प्रगती आणि गुणवत्ता, अध्ययन- अध्यापन गुणवत्ता, व्यवस्थापनातील नेतृत्व, पालकांचा सहभाग, भविष्यास उपयुक्त शिक्षण या 15 मूल्यांकन निकषांवर शाळांचे वर्गीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधा,  सामाजिक  सेवा, समग्र व आधुनिक शिक्षण, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय कल्याण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि एकात्मिक शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलची निवड करण्यात आली. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकामध्ये राहिले. परीक्षकांचे गुण, पालकांची मते व एज्युकेशन टुडे टीमचे सर्वेक्षण यावर आधारित हा निकाल जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्कूल म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला बहुमान प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल चेअरमन श्री संजय घोडावत यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या  सस्मिता मोहंती व सर्व शिक्षक शिक्षिका यांचे कौतुक  व अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.