करवीर कृषी विभागाच्या वतीने रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप.
करवीर कृषी विभागाच्या वतीने रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
करवीर प्रतिनिधी
रोहन कांबळे
--------------------------------
वाकरे- महाराष्ट्र शासन अंतर्गत तालुका कृषी अधिकारी करवीर यांचे मार्फत रब्बी हंगाम करिता फुले सुचित्रा वाणाचे रब्बी ज्वारीचे बियाणे(मिनी किट) शिंगणापूर येथे वाटप करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ अंतर्गत महाबीज कंपनीचे फुले सुचित्रा या बियाण्यांचे मोफत वाटप ग्रामपंचायत पदाधिकारी सौ.स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील यांनी फुले सुचित्रा वाणाची लागवड, खते व पाणी व्यवस्थापन,पीक संरक्षण विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक रामेश्वरी कांबळे यांनी उपस्थितांना बियाणे बीज प्रक्रिये विषयी माहिती देऊन १० गुंठे क्षेत्रासाठी १ किलो मिनी किटचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.
बियाणे वितरण कार्यक्रमावेळी शिंगणापूर,नागदेव वाडी,गावातील दीनानाथ पाटील,शहाजी पाटील,अभिजित पाटील,देवानंद जाधव,तसेच शिंगणापुर ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र चौगले,ग्रामविकास अधिकारी सौ.गायत्री जाखलेकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment