गांधीनगरातील झुलेलाल मंदिरासमोरील कचरा कोंढाळा नागरिकांच्या जीवावर.
गांधीनगरातील झुलेलाल मंदिरासमोरील कचरा कोंढाळा नागरिकांच्या जीवावर.
-----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
फ्री लान्स रिपोर्टर
आदित्य नैनानी
-----------------------------------------
:संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष
:स्थानिक रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गांधीनगर:- आदित्य नैनानी शेरू चौक रोडवर झुलेलाल मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर काही नागरिकांच्या अनास्थामुळे कचरा साठत असल्याने स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील कचरा कोंडाळा दूर करावा आणि अस्ताव्यस्त उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.
या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशी आणि काही व्यवसायिकांनी वेळोवेळी करवीर पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, यांना येथील कचऱ्याची विल्हेवाट अन्यत्र लावण्यासाठी लेखी व तोंडी निवेदन दिले. पण संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. साटणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी येथून ये-जा करणाऱ्यांना नाक धरून जावे लागत आहे. कचऱ्याच्या ढिगावर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने येथे खेळणाऱ्या लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कचरा कोंडावळा बंद करून तो इतरत्र करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट 1) संबंधित प्रशासनाने या कचरा कोंडाळ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला पाहिजे. या कोंढाळ्यामुळे ग्राहक तसेच स्थानिक नागरिक, वृद्ध, लहान मुले, यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आणि कचरा उघड्यावर टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
दीपक पोपटानी (फोटो फ्रेमवाले व्यावसायिक)
2) कचरा कोंढाळ्यामुळे भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या कचरा कोंढाळा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि येथील नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी अपेक्षा आहे.
आदित्य नैनानी (स्थानिक रहिवाशी)
फोटो ओळ:- शेरु चौक रस्त्यावरील झुलेलाल मंदिरासमोरील कचरा कोंडाळा नागरिकांच्या जीवावर उठत आहे.
झूलेलाल मंदिरासमोरील कचऱ्याचा प्रश्न दोनच दिवसात मार्गी लावणार आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सूचनाफलक लावण्यात येईल. आणि बेजबाबदार नागरिकावर कारवाई करण्यात येईल.
संदीप पाटोळे (सरपंच गांधीनगर)
Comments
Post a Comment