गळफास घेऊन दोन तरुणांनी जीवन संपवले.
गळफास घेऊन दोन तरुणांनी जीवन संपवले.
---------------------------------
दिंडनेर्ली : प्रतिनिधी
---------------------------------
गळफास घेवून दोन तरुणांनी आपले जीवन संपविले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
एकोंडी(ता.कागल) येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकाश विलास मातीवड्ड (वय २० वर्षे) असे त्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नंदगाव गावच्या हद्दीतील दूधगंगा डाव्या कालव्या जवळ असलेल्या गैबी दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या शेतात आंब्याच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.याबाबत अनिल वडर यांनी इस्पुर्ली पोलिसांत फिर्याद दिली आहे.आकाश हा महाविद्यालयात शिकत होता तर त्याचे वडील उसाच्या ट्रॅक्टर वरती ड्रायव्हर म्हणून काम करीत होते त्याच्या पश्चात आई,वडील,बहीण,आजी असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आहे.
कुर्डू (ता.करवीर)येथील शुभम शिवाजी साठे (वय २३ वर्षे) याने कुर्डू गावातील चोरझरा या नावाने ओळखला जाणाऱ्या शेतात झाडाला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.शुभम हा एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. एकुलता एक असलेल्या शुभमने असा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपविल्याने त्याच्या कुटुंबीयावरती संकट कोसळले आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,बहिण असा परिवार आहे.याप्रकरणी त्याचे चुलते बाजीराव साठे यांनी इस्पुर्ली पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नवरात्र सण साजरा करीत असतानाच दोन्ही तरुणांनी आत्महत्या केलेंने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दोन्ही घटनेत आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून इस्पुर्ली पोलीस स्टेशन चे स.पो.नि.विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश मेटील,माने
अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment