सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी- मंजीत माने.
सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी- मंजीत माने.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
करवीर प्रतिनिधी
रोहन कांबळे
-------------------------------
सारथी संस्थेमार्फत पीएचडी शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते महाविकासआघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा जितके विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट व पीएचडी कन्फर्मेशन तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी आपल्या सरकारने शिष्यवृत्ती सरसकट न देता फक्त दोनशे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब मराठा समाजातील अनेक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून मागे पडतील. आधीच नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुण नैराश्यात आहे व आपल्या या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय युवासेना (ठाकरे गट)कधीच सहन करणार नाही. आपले महायुती सरकार जाणून-बुजून मराठा समाजाला शैक्षणिक प्रवाह पासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे जर १५ नोव्हेंबरच्या आधी पात्र सर्व विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन तारखेपासून पीएचडी शिष्यवृत्ती जाहीर करावी. अन्यथा युवासेना विद्यार्थ्यांसह लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र सरकारला युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी दिला.
Comments
Post a Comment