विद्यार्थ्यांनी झाडे लावून ती जगवली पाहिजे असा संदेश
विद्यार्थ्यांनी झाडे लावून ती जगवली पाहिजे असा संदेश.|
अजित माळी.
विद्यार्थ्यांनी झाडे लावून जगवली पाहिजे त्यामुळे पर्यावरण वाचलपाहिजे असे आवाहन दाजीपूर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांनी दाजीपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत व विद्या मंदिर दाजीपूर या शाळेने आयोजित केलेल्या वन्यजीव सप्ताह प्रसंगी बोलताना केले आहे.
पर्यावरण बचाव सद्यस्थितीत कारणे व उपाय यावर विद्या मंदिर शाळेचे शिक्षक प्रशांत राणे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
त्याचबरोबर वन्यजीव सप्ताह निमित्त विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या गटासाठी प्रश्नमंजुषा व लहान गटासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये मोठ्या गटासाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक व लहान गटासाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना वनाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वनपाल धनाजी पाटील शंकर गुरव वनरक्षक योगेश पाटील बंडू माने शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गुरव प्रशांत तानावडे श्रीमती सुरेखा पवार श्रीमती नीला गवळी हे उपस्थित होते कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रशांत राणे व आभार दीपक पाटील यांनी मांडले.
Comments
Post a Comment