मराठा.आरक्षण साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा.

 मराठा.आरक्षण साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा.

----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

रिसोड प्रतिनिधी 

रणजीतसिंह ठाकुर

----------------------------------------------

मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या आदेशाने युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांच्याा नेतृत्वात शहराध्यक्ष विकास झुंगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पवन खोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हाधिकारी वाशिम, तहसीलदार रिसोड व सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या साखळी उपोषण मंडप स्थळी निवेदन देऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे. मराठा आरक्षण संदर्भात लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत सरकारने तातडीने मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढावा मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे.आम्ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रक्रमी सहभागी असतो.मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे व मराठा आरक्षण मिळणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे या लढ्यात आम्ही ताकदीने सहभागी आहोत.शासनाने मराठा समाजाच्या अस्मितेचा विचार करून त्यांना लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करीत असून मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.निवेदन देताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ, शहर अध्यक्ष विकास झुंगरे पाटील, तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष पवन खोडकर यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.