हेरले येथील मटका अड्ड्यावर हातकणंगले पोलीसांनी केली कारवाई.
हेरले येथील मटका अड्ड्यावर हातकणंगले पोलीसांनी केली कारवाई.
-------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------------------
हेरले येथे राजरोस सुरू असणाऱ्या मटका अड्यावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून मटका घेणाऱ्या दोन व्यक्तीसह मालक दस्तगीर महालिंगपूरे, आणि जमीर मुजावर याच्यावर कारवाई करत ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध आणि बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाई करण्याचे मुखशिल आदेश दिले होते. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे असलेल्या मुख्य चौकात खुलेआम मटका सुरू असल्याची माहिती हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांना गोपनीय व्यक्तीकडून मिळाल्याने त्यांनी तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले. या पोलीस पथकाने हेरले येथे मुख्य चौकामध्ये असणाऱ्या दूध डेअरी जवळ बेकायदेशीर मटका अड्ड्यावर धाड टाकून हर्षद शौकत खतीब याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडील रोख 630 रुपयासह मटक्याच्या चिट्ट्या ताब्यात घेण्यात आल्या. तर हनुमान मंदिर मुख्य चौकामध्ये राजरोसपणे सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावरही धाड टाकून राहुल संभाजी साळुंखे याच्यासह रोख चार हजार 170 रुपये आणि मटक्याचा चिट्ट्या ताब्यात घेतल्या.या दोन मटका घेणाऱ्या व्यक्ती सह बुकी चालक दस्तगीर महालीगपुरे आणि जमीर मुजावर याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीपी पथकाचे अतुल निकम, संग्राम खराडे यांनी केली.
Comments
Post a Comment