मसुटे मळा येथे झालेल्या तिहेरी अपघात मोटार सायकल स्वार गंभीर जखमी.

 मसुटे मळा येथे झालेल्या तिहेरी अपघात मोटार सायकल स्वार गंभीर  जखमी.

  गांधीनगर.-टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो ने किया कारला समोरून जोराचे धडक देत समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन जवळपास शंभर फूट फरफटत नेल्याने मोटर सायकल स्वार अमित कुमार सिद्राम बोरगावकर हा गंभीर जखमी झाला. यातील अपघातग्रस्त कार चालक सुमित जयस्वानी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत जखमीला सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केलं. हा अपघात बुधवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावर घडला.

 या अपघाताची अधिक माहिती अशी की,

गांधीनगर येथील ओरा ट्रान्सपोर्टकडील टेम्पो पेपर आणि औषधाचे साहित्य घेऊन रात्री साडेअकराच्या दरम्यान कोल्हापूरकडे निघाला होता.  तो टेम्पो तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील सरस्वती साडी डेपो जवळील साई फर्निचर जवळ आला असता टेम्पोचा उजव्या बाजूचा पुढील टायर फुटल्याने टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो एका बाजूला जाऊन तावडे हॉटेल कडून गांधीनगर कडे येणाऱ्या किया कारला समोरून जोराची धडक दिली या धडकेने कार


गांधीनगर जाणारे सुमित जयस्वानी फिरून कोल्हापूर च्या दिशेला गेली.  याच दरम्यान तावडे हॉटेलहुन गांधीनगर कडे जाणाऱ्या मोटर सायकल ला समोरून टेम्पो ने जोराची धडक बसली मोटर सायकल स्वारासह त्याची मोटरसायकल टेम्पोच्या पुढील भागात अडकल्याने त्याला शंभर ते दीडशे फूट फरपटत नेले. यामध्ये मोटर सायकल स्वार अमित कुमार सिद्राम बोरगावकर हा गंभीर जखमी झाला. तर मोटरसायकलचा चक्काचूर  झाला.  यामध्ये किया कारचे मोठे नुकसान झाले असून.  किया कारचे मालक सुमित जस्वाणी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत जखमीला आपल्या अपघात ग्रस्त कार मध्ये बसवून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. हा अपघात रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला असून या अपघाताची नोंद 24 तासानंतर ही गांधीनगर पोलीस ठाण्यात झालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.