सरवडे गावचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील यांचे चिरंजीव रितेश पाटील यांचे अपघाती दुःखद निधन.

 सरवडे गावचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील यांचे चिरंजीव रितेश पाटील यांचे अपघाती दुःखद निधन.

घटना स्थावरील मिळालेल्या माहिती नुसार निपाणी- फोंडा रोडवर सरवडे पुलावर गुरुवार (ता.१९ रोजी )

रात्री ११ वाजेच्या सुमारास दुधगंगा नदीपुलावर सरवडेहुन राधानगरीकडे जात असताना फोर व्हीलर चालकाचा ताबा -

सुटल्याने नदीपुलाच्या कठड्याला धडकली. चालक रितेश पाटील (वय २१ वर्ष) रा.

सरवडे हा गंभीर जखमी झाला. तात्काळ त्यास कोल्हापूर येथील खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. रितेश डीग्रीच्या तिसऱ्या वर्षात पुणे येथे शिक्षण घेत होता. सुट्टी निमित्त सरवडे गावी आला होता. मनमिळावू स्वभावाचा असलेने गावात त्या मोठा मित्र वर्ग होता. ऐन दसऱ्याच्या सुमारास अशी दुदैवी घटना घडल्याने सरवडे परिसरात पाटील कुटुंबियावर

दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.