सकल मराठा समाजाचे राजधानी साताऱ्यात शिस्तबद्ध आंदोलन.
सकल मराठा समाजाचे राजधानी साताऱ्यात शिस्तबद्ध आंदोलन.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा: प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------------
राजधानी सातारा येथे सकल मराठा समाजाचे शिस्तबद्ध आंदोलन पार पडले.
आंदोलनात आलेल्या मराठा समाजाची शिस्त आणि आंदोलनकर्त्यांनी सातारा बंद ची दिलेली हाक आणि त्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व काही आश्चर्यकारक होते. एक मराठा लाख मराठा, जय श्रीराम, या घोषणानी सातारा नगरी दुमदुमली. सातारा परिसरातील गावातील बहुसंख्य मराठा समाज दुचाकी रॅली आणि पायी चालत आल्याचे पाहावयास मिळाले. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ह्या आरोळ्या दिल्या जात होत्या. एव्हडा मोठा जणसमुदाय एव्हड्या शिस्त बद्ध पद्धतीने सातारा येथील पोवई नाका येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अहिंसेच्या मार्गाने शांततेत मोर्चा पार पाडताना दिसला.
Comments
Post a Comment