कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल अधिष्टाता प्रकाश गुरव यांची भेट.
कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल अधिष्टाता प्रकाश गुरव यांची भेट.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी घटना घडत आहेत,त्याला अनुसरून प्रत्येक ठिकाणी मुख्य शासकीय हॉस्पिटल मध्ये,औषधांचा साठा पुरेसा आहे कि नाही? रोजच्या सर्जरी वेळेवर होतात कि नाही? रक्त पेढी मध्ये रक्त साठा किती आहे?बहु चर्चीत एम.आर.आय मशिने केव्हा येईल? हॉस्पिटल परिसरातील अस्वच्छता? सध्या स्टाफ किती आहे? हॉस्पिटल मधील एखाद्या डिपार्टमेंट वर लोड आला तर, तो कसा कमी करण्यात येतो? सध्या कार्यरत असलेल्या स्टाफ ची संख्या किती? अतिदक्षता विभागातील यंत्रणा?सोनोग्राफी साठी होणाऱ्या लोकांच्या फेऱ्या कश्या कमी केल्या पाहिजेत?
अश्या अनेक विषयांवर चर्चा करुन अधिष्ठाता (डीन) यांच्या कडून युवासेनेच्या पदाधिकारी यांनी माहिती घेतली व सर्व टीम यंत्रणा अजूनही योग्य पद्धतीने कराव्यात अशी विनंती केली.व यामध्ये मदतीसाठी युवासेना अग्रेसर राहिल असे युवासेना पदाधिकारी यांनी सांगितले. यांनतर अधिष्ठाता (डीन)प्रकाश गुरव यांनी ही पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. या भेटी चर्चे दरम्यान युवासेना जिल्हाप्रमुख मंजित किरण माने, जिल्हा चिटणीस अमित बाबर, शहर युवाअधिकारी योगेंद्र माने, उपशहर युवा अधिकारी चैतन्य देशपांडे, अक्षय घाटगे, सुनील कानूरकर,अभिषेक दाबाडे, विभाग युवा आकाश शिंदे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment