मराठा समाजान अण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेउन उदयोजक व्हांव .नरेंद्र पाटील*मराठा समाजानं उद्दोजक व्हावं.

 मराठा  समाजान अण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेउन उदयोजक व्हांव .नरेंद्र पाटील मराठा समाजानं उद्दोजक व्हावं. 

भणंग  :- महाराष्ट्रातील  जास्त तरुणांना उदयोगपती बनवणे हिच माझी इच्छा असलेचे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेन्द्र पाटील यांनी कार्यकत्यांना संबोधीत करताना म्हणाले  अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा यांचे वतीने सर्कीट हाऊस येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते  मराठा समाजाला उद्योगपती बनवणेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे माध्यमातुन सर्वांनी प्रयत्न करणे गरजेच आहे तसेच संघटनावाढी साठी नुतन पदाधिकारी यांनी जोमाने कामं करा सातारा जिल्ह्याचे वतीने सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील व युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी पाटील साहेबांचा सत्कार केला सदर आढावा बैठकीत नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ या बाबत जवळपास दोन तास चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन केले कर्ज प्रकरण मंजुर करून देतो असे सांगणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट असलेचे कार्यकर्ते यांनी पाटील साहेबांना सांगीतले मराठा महासंघातर्फे सामाजीक कार्य सुरूच ठेवा फक्त अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ उदीष्ट नाही तर व्यसनमुक्ती, दारूबंदी अशा विविध सामाजीक कार्य संघटनेनं केली पाहीजेत आपले संघटनेत असलेला पदाधिकारी, कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे हे पाहु नका संघटनेत काम करताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवुन काम करा असेही ते म्हणाले  जावली ,वाई,तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देवून त्यांच्या निवडी करण्यात आल्या  या वेळी दतात्रय पाटील जिल्हाध्यक्ष, जितेंद्र भोसले युवा जिल्हाध्यक्ष , राजेंद्र इथापे उपाध्यक्ष , सातारा जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा नमिताताई मोहीते पाटील , वर्षाताई काळंगे  , जावळीचे अध्यक्ष दादा करंदकर , विजय धुमाळ अध्यक्ष वाई , सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष न्यूज मराठी लाईव्ह चे अनिल करंदकर पाटील, सि एम न्यूज दक्षिण सातारा जिल्हा प्रमुख सोशल मिडीयाचे महेश चव्हाण साहेब बजरंग चौधरी सुनिल धनावडे संजय वांगडे शेखर जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थीत होते

चौकट

एखादी बँक कर्ज देणेस टाळाटाळ करीत असलेस अथवा कर्ज प्रकरण मंजुर करून देतो असे म्हणणारे एजंट सापडलेस आपले सातारा कार्यालयात संपर्क करा वेळ पडलेस सहकार्य न करणारे बँकांना व एजंटांना मराठा महासंघ काय असतो हे दाखवुन द्या. अखिल भारतीय मराठा महासंघ तुमच्या कायम पाठीशी राहील

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.