कंटेनरचालकाच्या हलगर्जी पणामुळे कंटेनरचा किन्नर जागीच ठार.

 कंटेनरचालकाच्या हलगर्जी पणामुळे कंटेनरचा किन्नर  जागीच ठार.

राधानगरी तालुक्यातील दावतवाडी येथे कंटेनर चा किन्नर चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाली असल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की कोकणातून येणारा कंटेनर नंबर आर जे 14 जीएफ 87 78 हा मालवाहू कंटेनर चालक विजय सिंह राहणार गुर्जर तालुका महुवा राजस्थान हा आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दावतवाडी येथे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत असताना दावतवाडी गावाजवळ आला असताना किन्नर बिरम बाबूलाल सिंह राहणार खेड ला नांदो ती जिल्हा गंगापूर हा रस्त्यावर पडल्याने कंटेनरच्या मागील चाकात सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला  याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संदीप बळवंत पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर राधानगरी पोलिसांनी कंटेनरचा चालक याच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला.

या अपघाताचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घाटगे हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.