कुंभी कासारीचे ७ लाख मे.टन उसाचे गाळप उदिष्ट - चंद्रदीप नरके.
कुंभी कासारीचे ७ लाख मे.टन उसाचे गाळप उदिष्ट - चंद्रदीप नरके.
कुंभी कासारी साखर कारखान्याचा ६१ गळीत हंगाम शुभारंभ.
यदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेने ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही मागील हंगामात दिलेला उच्चांकी ऊस दर, सवलतींच्या साखरेसह सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक तोडणी वहातुक टोळ्यांनी करारासाठी प्रतिसाद दिल्याने २०२३/२४ चा हंगामात ७ लाख मे टन ऊस गाळप उदिष्ट पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कुंभी कासारी साखर कारखान्याचा ६१ गळीत हंगाम शुभारंभ अध्यक्ष माजी आ.चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले या हंगामात कारखान्याकडे ११ हजार २३७ हेक्टर उसाचे क्षेत्र नोंद
आहे.कारखान्याकडे ऊसतोडणी वहातुकीला सभासद शेतकऱ्यांनी स्थानिक टोळ्यांचा करार करण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे.मागील हंगामातील संपूर्ण एफआरपी एकरक्कमी अदा केली आहे.यामुळे सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी साखरेला प्रति किलो ४५ रूपये हमी भाव व इथेनॉलच्या दरात ५ रूपये दर वाढ दिली तर एफआरपी देण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
यावेळी संचालक अँड. बाजीराव शेलार, विलास पाटील, अनिल पाटील, उत्तम वरूटे,सर्जेराव हुजरे,अनिष पाटील, संजय पाटील, राहूल खाडे, किशोर पाटील,पी डी पाटील,दादासो लाड,बळवंत पाटील,प्रकाश पाटील,युवराज शिंदे,राऊ पाटील,वसंत आळवेकर,के.डी. कांबळे,प्रमिला पाटील,धनश्री पाटील,रवि मडके,तानाजी पाटील,सुरेश काटकर कार्यकारी संचालक धिरजकुमार माने,सचिव प्रशांत पाटील,सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment