वारसा हक्क नोंदणीकरिता करता ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधिक्षक सापडला एसीबीच्या जाळ्यात.
वारसा हक्क नोंदणीकरिता करता ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधिक्षक सापडला एसीबीच्या जाळ्यात.
वारसा हक्क नोंदणीकरिता करता ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
निवास वसंत पाटील ( वय- 43 रा. सामंत बिल्डिंग, सरकारी दवाखाना रोड, आजरा,ता. आजरा मुळ रा. कसबा वाळवे ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ) असे आरोपीचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ( दिनांक २० रोजी )ही कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्युपत्राद्वारे,तक्रारदार यांची आई हयात असताना त्यांचे नावे केली होती. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मिळकती मधील गाव चिमणी, तालुका आजरा येथील न भू क्र 373 या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डाला वारसा हक्काने तक्रारदार यांचे तसेच त्यांचे वडील व भाऊ यांचे नाव लावणे करिता आरोपी उपअधीक्षकाने तक्रारदार यांचेकडे 6,000 रुपये लाच रक्कम मागणी केली. तक्रारदार यांचेकडून ही लाच स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई
Comments
Post a Comment