वसा आयुष्यभर जपला ज्ञानदानाचा पुढील पिढीने वारसा जपला दातृत्वाचा.

 वसा आयुष्यभर जपला ज्ञानदानाचा पुढील पिढीने वारसा जपला दातृत्वाचा.


 भणंग:- कोरोना काळापासून 

 शिक्षणाचे वाढलेले महत्व,आधुनिक काळाची गरज,शिक्षण क्षेत्रात वाढलेले तंत्रज्ञानाचे महत्व हे ओळखून स्वर्गीय विठ्ठल सावळा करंजेकर(गुरुजी) यांच्या स्मरणार्थ श्री.योगेश सुरेश करंजेकर(अप्पर कोषागार अधिकारी जिल्हा कोषागार कार्यालय,सातारा), सौ.शीतल योगेश करंजेकर(लेखाधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,सातारा),राजेश करंजेकर (संगणक ऑपरेटर ग्रामपंचायत),आश्विनी करंजेकर(जिल्हा न्यायालय, सातारा) यांचे वतीने  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिभवी या शळकेस ४३ इंची स्मार्ट टि.व्ही चे वाटप करण्यात आले. 

याच सोबत उपस्थित सर्व पालक,ग्रामस्थ व शिक्षक यांना इडली सांबर चटणी असा चविष्ट नाष्टा देण्यात आला.विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ म्हणून प्रत्येकी एक राजगिरा लाडू पाकीट यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दानशूर करंजेकर कुटुंबिय,भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय अरविंद दळवी साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य,माता पालक संघ अध्यक्षा,उपाध्यक्षा व सदस्य उपस्थित होते.

या अनमोल अशा दातृत्वा बद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बिभवी,शाळा व्यवस्थापन समिती बिभवी, माता पालक संघ,बिभवी ग्रामस्थ मंडळ,बिभवी यांचे वतीने करंजेकर कुंटुंबियांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.