आ. प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन..
टेलर ना पेन्शन व टेलरांचे महामंडळ स्थापन करू; आ. प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन..
-----------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
टेलरांचे महामंडळ तसेच टेलरांना पेन्शन मिळावी व त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळावा. या प्रमुख मागण्यांसाठी राधानगरी, भुदरगड, आजरा, कागल, गडहिंग्लज या तालुक्यातून टेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्यावतीने आ. प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य टेलर्स वेल्फेअर चे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेलरांच्या असणाऱ्या विविध समस्यांचा पाढा आमदारांच्या झालेल्या बैठकी मांडण्यात आला . त्यानंतर आबिटकर यांनी टेलरांच्या असणाऱ्या समस्या शासन दरबारी पोचवून टेलरांना योग्य तो न्याय मिळेपर्यंत लढा देऊ असे आश्वासन आबिटकर यांनी दिले. यावेळी भुदरगड तालुकाध्यक्ष सुनील कापसे, राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, धनाजी पाटील, मोहन कांबळे, राजेंद्र भावके, हसन हेरवाडे यांनी मनोगते व्यक्त केलीत. या बैठकीस महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाचे आभार तुरंबेकर यांनी मांडले .
Comments
Post a Comment