ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे ता. 9 ते 18 अखेर जिल्ह्यात व्यसनमुक्त अभियान.
ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे ता. 9 ते 18 अखेर जिल्ह्यात व्यसनमुक्त अभियान.
कोल्हापूर :ब्रह्मकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
कोल्हापूर जिल्ह्यात 9 ते 18 ऑक्टोंबर अखेर व्यसनमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी राजयोगिनी सुनंदा दीदी यांनी दिली.
सुनंदा दीदी पुढे म्हणाल्या, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत व्यसनमुक्त भारत अभियानसाठी नवी दिल्लीत ब्रह्माकुमारी संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्यामुळे ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभर हे अभियान राबवले जाणार आहे. सध्या तरुण वर्गामध्ये व्यसन वाढले आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट , ड्रॅग ,दारू याबरोबरच मोबाईल सारख्या साधनांचे व्यसन लागले आहे.या व्यसनामुळे लोकांना सामाजिक, आरोग्य, आर्थिक विषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतात दररोज 14 ते 18 वयोगटातील 5500 मुले व्यसनाधीन होत आहेत. तर साडेतेरा लाख लोकांचा मृत्यू तंबाखूचे व्यसनामुळे होत आहेत. ही व्यसने दूर करण्यासाठी उचित मार्गदर्शन ,समुपदेशन ,औषधे सात्विक आहार व योग आवश्यक आहे .हे सर्व मार्गदर्शन करण्यासाठीच ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे. 10 ऑक्टोंबर रोजी शिवाजी विद्यापीठात या अभियानचे उद्घाटन होणार आहे जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन सुनंदा दीदी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment