गांधीनगर पोलीसाकडून मोटार सायकल चोरी उघडकीस परंतू गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ? 140 घरफोडीचा तपास केव्हा लागणार?

 गांधीनगर पोलीसाकडून मोटार सायकल चोरी उघडकीस परंतू गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ? 140 घरफोडीचा तपास केव्हा लागणार?

गांधीनगर:-  साईनाथ काॅलनी मनेर माळ या ठिकाणी राहणाऱ्या सतिश विलास पांचगे यानी आपल्या दारात उभी केलेली स्पेलेडर मोटार सायकल एम एच ई एक्स 3291आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली होती 

सदर मोटरसायकल चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी  पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, पोलीस अंमलदार बजरंग हेबाळकर संदीप कुंभार सचिन सावंत संतोष कांबळे रोहन चौगले यांना तपास करण्याचे आदेश दिले होते दिलेल्या आदेशानुसार अज्ञात चोरट्यांचा व चोरीला गेलेल्या मोटार सायकल चा शोध घेत असताना उंचगाव ब्रिज  येथील रिक्षा स्टॉप वर सौरभ पांडुरंग गोंधळी वय वर्ष 23  शुभम प्रभाकर कवाडे वय वर्ष 23 राहणार दोघेही टेंबलाईवाडी हे तरुण मोटार सायकल वरून संशयास्पद फिरत असताना  ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटार सायकल मनेरमाळ येथुन चोरी केली  असल्याची कबुली दिली  या मोटार सायकल चोरीचा तपास अवघ्या चार पाच दिवसात गांधीनगर डी बी पथकाने लावला त्याप्रमाणे  गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 409/2023 भारतीय दंड विधान संहिता कलम 379  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

----------------------------------------

- १४० वर चोऱ्यांचा शोध केव्हा लावणार?

----------------------------------------

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजतागायत 140 च्या आसपास घरफोड्या घडलेल्या आहेत त्याही घरफोडीचा तपास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली डिबी पथकाने लावावा अशी मागणी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांकडून होत आहे. या चोऱ्यांचा तपास कधी लागणार, याची प्रतीक्षा गांधीनगर सह परिसराला लागून राहिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.