Posts

Showing posts from October, 2023

सकल मराठा समाजाचे राजधानी साताऱ्यात शिस्तबद्ध आंदोलन.

Image
 सकल मराठा समाजाचे राजधानी साताऱ्यात शिस्तबद्ध आंदोलन. ------------------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा: प्रतिनिधी अमर इंदलकर ------------------------------------ राजधानी सातारा येथे सकल मराठा समाजाचे शिस्तबद्ध आंदोलन पार पडले. आंदोलनात आलेल्या मराठा समाजाची शिस्त आणि आंदोलनकर्त्यांनी सातारा बंद ची दिलेली हाक आणि त्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व काही आश्चर्यकारक होते. एक मराठा लाख मराठा, जय श्रीराम,  या घोषणानी सातारा नगरी दुमदुमली. सातारा परिसरातील गावातील बहुसंख्य मराठा समाज दुचाकी रॅली आणि पायी चालत आल्याचे पाहावयास मिळाले. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ह्या आरोळ्या दिल्या जात होत्या. एव्हडा मोठा जणसमुदाय एव्हड्या शिस्त बद्ध पद्धतीने सातारा येथील  पोवई नाका येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अहिंसेच्या मार्गाने शांततेत मोर्चा पार पाडताना दिसला.

करवीर कृषी विभागाच्या वतीने रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप.

Image
  करवीर कृषी विभागाच्या वतीने रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   करवीर प्रतिनिधी  रोहन कांबळे --------------------------------  वाकरे- महाराष्ट्र शासन अंतर्गत तालुका कृषी अधिकारी करवीर यांचे मार्फत रब्बी हंगाम करिता फुले सुचित्रा वाणाचे रब्बी ज्वारीचे बियाणे(मिनी किट) शिंगणापूर येथे वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ अंतर्गत महाबीज कंपनीचे फुले सुचित्रा या बियाण्यांचे मोफत वाटप ग्रामपंचायत पदाधिकारी सौ.स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील यांनी फुले सुचित्रा वाणाची लागवड, खते व पाणी व्यवस्थापन,पीक संरक्षण विषयी  सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक रामेश्वरी कांबळे यांनी उपस्थितांना बियाणे बीज प्रक्रिये विषयी माहिती देऊन १० गुंठे क्षेत्रासाठी १ किलो मिनी किटचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. बियाणे वितरण कार्यक्रमावेळी शिंगणापूर,नागदेव वाडी,गावातील दीनानाथ पाटील,शहाजी पाटील,अभिजित पाटील,देवानंद जाधव,तसेच शिंगणापुर ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र चौगल

मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण.

Image
 मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण. ----------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------- मुरगूड -येथील सकल मराठा समाज आणि नागरिकांच्या वतीने शिवतीर्थ मुरगुड येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली . सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मातेस पुष्पहार घालून अंबाबाई मंदिरापासून तुकाराम चौक येथील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली उपोषणा ठिकाणी आली . यानंतर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली . महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलने सुरू आहेत . अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे .तसेच अनेक ठिकाणी उपोषणाचा हत्यार उभारण्यात आले आहे . मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे - पाटील यांचे उपोषण सुरू होते . सरकारने यावरती निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला होता तो वेळ पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे .यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र हे आंदोलन तीव्र करण्यात आले असून . याचाच एक भाग म्हणून मुरगूड शहरातील नागरिकांनी तसेच सकल

हेरले येथील मटका अड्ड्यावर हातकणंगले पोलीसांनी केली कारवाई.

Image
  हेरले येथील मटका अड्ड्यावर हातकणंगले पोलीसांनी केली कारवाई. ------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  ------------------------------------------- हेरले येथे राजरोस सुरू असणाऱ्या मटका अड्यावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून मटका घेणाऱ्या दोन व्यक्तीसह मालक दस्तगीर महालिंगपूरे, आणि जमीर मुजावर याच्यावर कारवाई करत ताब्यात घेण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध आणि बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाई करण्याचे मुखशिल आदेश दिले होते. त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे असलेल्या मुख्य चौकात खुलेआम मटका सुरू असल्याची माहिती हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांना गोपनीय व्यक्तीकडून मिळाल्याने त्यांनी तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले. या पोलीस पथकाने हेरले येथे मुख्य चौकामध्ये असणाऱ्या दूध डेअरी जवळ बेकायदेशीर मटका अड्ड्यावर धाड टाकून हर्षद शौकत खतीब याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडील रोख 630 रुपयासह मटक्याच्या चिट्ट्या ताब्यात घेण्यात आल्या. तर हनुमान मंदिर मुख्य चौकामध्ये

युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन.

Image
  युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन. युवासेना  कोल्हापूर(ठाकरे गट) यांच्या वतीने दीपावली निमित्त गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मंजित माने आणि युवासेना जिल्हा व शहर सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे आणि स्पर्धेसाठी १ रुपया फी असल्याचे युवासेना पदाधिकारी यांनी सांगितले. स्पर्धेचे नियम व अटी पुढीप्रमाणे- १)किल्ला मातीचा असावा.२)परीक्षकांचा निर्णय अखेरचा असेल.३)परीक्षक येण्याआधी गडकिल्या विषयी माहिती सांगणाऱ्या मावळ्यांनी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मावळ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. स्पर्धेमधे नोंदणी साठी संपर्क पुढीप्रमाणे- ८३०८६४५२५२,९३२५२९४९८९,९८८१८९९७५७,७३५०१६५२५४,८२०८५५५३१९

भात कापणी साठी जात असताना बांधावरून पाय घसरल्याने तळगाव येथील शेतकऱ्यांचा मुत्यु.

Image
  भात कापणी साठी जात असताना बांधावरून पाय घसरल्याने तळगाव येथील शेतकऱ्यांचा मुत्यु. राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील धोंडीराम बाळू कांबळे वर्षे 72 हा आपल्या शेतातील भात कापण्यासाठी जात असताना बांधावरून पाय घसरून पडल्याने ते जागीच मयत झाले असल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. मयत धोंडीराम कांबळे याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला  पोस्टमार्टम झाल्यानंतर धोंडीराम कांबळे यांचा मृतदेह  नातेवाईकांच्याकडे ताब्यात देण्यात आला या या दुर्घटनेमुळे तळगावात शोक व्यक्त केला जात आहे . याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत

मराठा.आरक्षण साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा.

Image
  मराठा.आरक्षण साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र रिसोड प्रतिनिधी  रणजीतसिंह ठाकुर ---------------------------------------------- मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणास भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या आदेशाने युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांच्याा नेतृत्वात शहराध्यक्ष विकास झुंगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पवन खोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हाधिकारी वाशिम, तहसीलदार रिसोड व सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या साखळी उपोषण मंडप स्थळी निवेदन देऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे. मराठा आरक्षण संदर्भात लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत सरकारने तातडीने मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढावा मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे.आम्ही न

जावळीच्या सकल मराठा समाजाचा राजधानीत मराठा आरक्षण मागणी साठी तहसीलदार यांना निवेदन व टुव्हिलर रॅली .

Image
 जावळीच्या  सकल मराठा समाजाचा राजधानीत मराठा आरक्षण मागणी साठी तहसीलदार   यांना निवेदन व  टुव्हिलर  रॅली . भणंग प्रतिनिधी  : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे, राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे  काल सोमवारी जावळीची राजधानी मेढा येथे मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे  यासाठी जिवाची बाजी पणाला लावणारे मराठा योद्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देणेसाठी सुमारे  हजारो सकल मराठा समाज जावली बांधवांनी मेढा शहरातून दुचाकी रॅली काढली. आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी योग्य  ती काळली घेतली होती . सर्वप्रथम मेढा नगरीचे ग्राम दैवत भैरवनाथाचे मंदिरामधे सर्व मराठा बांधव एकत्र आले त्यानंतर ही दुचाकी रॅली भैरवनाथ मंदिर मेढा - कुंभारवाडा - वेण्णा हायस्कूल - वेण्णा चौक - आंबेडकर नगर चौक - एस टी डेपो - शिंदे कोयना हॉटेल  मार्गे तहसीलदार

सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी- मंजीत माने.

Image
  सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी- मंजीत माने. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  करवीर  प्रतिनिधी रोहन कांबळे  -------------------------------     सारथी संस्थेमार्फत पीएचडी शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते महाविकासआघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा जितके विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट व पीएचडी कन्फर्मेशन तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी आपल्या सरकारने शिष्यवृत्ती सरसकट न देता फक्त दोनशे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब मराठा समाजातील अनेक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून मागे पडतील. आधीच नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुण नैराश्यात आहे व आपल्या या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय युवासेना (ठाकरे गट)कधीच सहन करणार नाही. आपले महायुती सरकार जाणून-बुजून मराठा समाजाला शैक्

पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनचा वापर करणे गरजेचे - समरजित घाटगे.

Image
  पाण्याच्या नियोजनासाठी  ठिबक सिंचनचा वापर करणे गरजेचे - समरजित घाटगे. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कागल प्रतिनिधी विजय कांबळे -------------------------------- आत्तापर्यंत ठिबक हे आपण फक्त पिकाच्या उत्पादन वाढीसाठी वापरत होतो पण येत्या काळात अनियमित पावसाची परिस्थिती पाहता पाण्याच्या नियोजनासाठी आपण ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह  घाटगे यांनी केले.  छ.शाहू साखर कारखान्याच्या ऊस पिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील व व्हीएसआय पुणे चे प्रमुख शास्ञज्ञ डाॅ.अशोक कडलग हे प्रमुख उपस्थित होते.या वेळी बोलताना घाटगे म्हणाले की,शाहू कारखान्याने सन २००३ मध्ये ऊस विकास संकल्पना सुरु केली होती.  येत्या काळात आपल्या शेतात खतांचा किती वापर करायचा, जमिनी ला किती खतांची आवश्याकता आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.बहुतांशी वेळा गरजेपेक्षा जास्त खते आज वापरली जातात.खतांच्या किमतीही

वसगडे व सांगवडे गावांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा!

Image
  वसगडे  व  सांगवडे गावांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा! --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सांगवडे प्रतिनिधी  विजय कांबळे --------------------------------------- वसगडे. सांगवडे गावातील रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत रुग्णांचे प्राण वाचावेत यासाठी स्वर्गीय दुर्योधन दादा पाटील व स्वर्गीय राजमती दुर्योधन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुकुमार दुर्योधन पाटील व उज्वला सुकुमार पाटील यांनी वसगडे गावातील भाजी मार्केट येथे मोफत रुग्णवाहिका वसगडे व सांगवडे गावातील रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पण केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मा. प्राचार्य डॉ आर आर कुंभार तर प्रमुख पाहुणे मा.श्री अशोक रोकडे (संस्थापक अध्यक्ष व्हाईट आर्मी कोल्हापूर) प्रमुख उपस्थिती सौ योगिता बागडी सरपंच वसगडे सौ रुपाली कुंभार, डॉक्टर चामुंडराय पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वसगडे ,श्री भुजगोडा पाटील, मा सुनील पाटील,श्री संजय पाटील, प्राचार्य डॉ एच पी पाटील,श्री शितल भेडवंडे, श्री भालचंद्र गुरव, श्री अभय चौगुले, श्री बळीराम देसाई, श्री महावीर वळीवडे, प्रकाश नलावडे, प्रदीप देवारे सुरेश कारंड

बोरगाव पोलिसांनी केला सव्वा सहा किलो गांजा जप्त !

Image
  बोरगाव पोलिसांनी केला सव्वा सहा किलो  गांजा जप्त ! बोरगावं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री तैलतुबडे यांनी दोन ठिकाण  धडक कारवाई  करत सुमारे सव्वा  सहा  किलो गांजा जप्त केला गोपनीय माहितीनुसार पहिली कारवाई ही कुसवडे गावात अशोक पांडुरंग पवार रा. कुसवडे. ता.जि. सातारा. यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ गांजा लागवड केली होती त्यांच्या जवळून 5 किलो 130 ग्राम वजनाचा गांजा आणि 128500/ किंमतीचा गांजा सदृश्यवनस्पती हस्तगत करत कारवाई केली. तर दुसऱ्या कारवाईत अमोल आण्णा मोहिते रा. नागठाणे ता. जि. सातारा याच्यावर करत त्याच्या राहत्या घराशेजारी गांजा विक्री करीत असल्याने त्याच्यावर कारवाई केली गेली,  सदर इसमा कडून 1 किलो 120 ग्राम  28000 हाजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईतील एकूण मिळून 1,56,500/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचाल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि मा. श्री. रवींद्र तैलतुबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम निकम,सहायक

भाजप युवा मोर्चाची जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित घनवटकर यांची नियुक्ती.

Image
 भाजप युवा मोर्चाची जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित घनवटकर यांची नियुक्ती. भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारणीची नुकतीच घोषणा झाली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी अभिजित घनवटकर यांच्याकडे देण्यात आली आहे अभिजित घनवटकर हे गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात मुख्य पुजारी आहेत, अभिजित घनवटकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठी आरक्षणाला अनोख्या पध्दतीने पाठिंबा !

Image
  राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठी आरक्षणाला अनोख्या पध्दतीने पाठिंबा ! आज दि.२९/१०/२०२३ रोजी राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मा.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध याकरिता राजाराम तलाव येथे  अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.त्यामध्ये धनपाल संकपाळ, नामदेव वाईंगडे, किरण माने,अनिल शेलार,अनिल  पाटील, संभाजी देसाई,अमर परीट,संदीप पाटील,अनंत कोळी, विनोद थोरात, संदीप कोळेकर,जयसिंग पवार, जनार्दन पाटील,शिवाजी प्रभू, अमर यादव, बाबुराव यादव, जितकर साहेब,शिंदे साहेब उपस्थित होते

पडळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विश्वास पाटील.

Image
  पडळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विश्वास पाटील. राधानगरी तालुक्यातील पडळी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी विश्वास बापू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली पडळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रवीण वसंत पाटील यांनी आपल्या पदाची मुदत संपलेली असल्याने त्यांनी आपला पदाचा राजीनामा सरपंच त्यांच्याकडे देण्यात आला पडळी ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त असल्याने सरपंच सुरेश पाटील यांनी विशेष सभा बोलून उपसरपंच पदाची निवडणूक लावली त्यावेळी उपसरपंच पदासाठी विश्वास बापू पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली  या निवडीच्या वेळी राधानगरी पंचायत समितीचे माझी उपसभापती मोहन पाटील  डॉक्टर संजय पाटील तसेच तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार ग्रामसेवक शरद गुरव यांनी मांडले

रिसोड येथे महर्षी वाल्मिकी महाराज जयंती.

Image
 रिसोड येथे महर्षी वाल्मिकी महाराज जयंती. दिनांक 28-10-2023 रोजी वाल्मिकी नगर येथे महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अनंतरावजी देशमुख साहेब मा. मंत्री,मा.खासदार व मा.श्री. लखनजी मलिक साहेब वाशिम-मंगरुळपीर विधानसभा आमदार तसेच प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले मा. कृष्णाजी आसनकर महाराज, सौ.विजयमाला आसनकर, मा.अरुण देशमुख साहेब, मा.नारायण गायकवाड, मा. कुलदीप देशमुख साहेब,मा. संतोषभाऊ चरहाटे,मा. महपती इंगळे,मा. अनंताभाऊ देशमुख, परेशजी अग्रवाल व सर्व मित्र मंडळी उपस्थित होते.आणि जयंतीचे अध्यक्ष मा. मयुर नकवाल आणि उपाअध्यक्ष मा. अमित नकवाल होते. तसेच सूत्रसंचालन मा. संदीपभाऊ देशमुख यांनी केले. व आभार प्रदर्शन मा. मयुर नकवाल यांनी.

राधानगरी दाजीपूर जंगल सफारी १ नोव्हेंबर पासून होणार सुरु.

Image
  राधानगरी दाजीपूर जंगल सफारी १ नोव्हेंबर पासून होणार सुरु. सर्व निसर्गप्रेमी पर्यटकांचे आकर्षण असलेली राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील दाजीपूर सफारी येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होत आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोंबर सफारी पूर्ण बंद असते. १ नोव्हेंबर पासून सुरु होणारी हि सफारी मे माहिन्या पर्यंत सुरु राहते. ओपन जीप मधून जंगलात फेरफटका मारण्यासाठी राज्यातून पर्यटक येथे भेट देत असतात. विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांचं  येथे दर्शन होते. दर मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असून बाकी दिवशी अभयारण्य सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत सुरु असते. स्थानिक ग्रामस्थांच्या ओपन जीप मधून जंगल सफारी घडवण्यात येते. दाजीपूर मधून व राधानगरी मधून जंगल सफारी गाडी उपलब्ध होते. सध्या थंडी व धुक्या मुळे आल्हाददायक वातावरण दाजीपूर भागात असते त्यामुळे आतापासूनच बुकिंग जोरात असलेचे स्थानिक जीप चालक यांनी सांगितले.

पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य विध्यार्थ्यानी करावे "

Image
   पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य विध्यार्थ्यानी करावे " प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी . " आयुष्यमान भारत योजनेत सामील झालेल्या व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यास पात्र असून,समाजातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार, शेतमजूर व शेतकरी वर्गातील लोकांपर्यंत हे पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजाच्या तळागाळात पोहचविण्याचे कार्य महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी करावे व त्यातूनच स्वतःच्या कुटुंबियांना व समाजाला या योजनेचा फायदा सांगावा " असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी केले. जावली तालुका  आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत या योजने विषयी जनजागृती व्हावी म्हणून, जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे,पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच या विषयाची माहीती देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्याधिकारी डॉ

गांधीनगर मेनरोडवरील नित्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय करा करवीर शिवसेनेची मागणी.

Image
  गांधीनगर मेनरोडवरील नित्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय करा करवीर शिवसेनेची मागणी. ---------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- गांधीनगर : गांधीनगर बाजारपेठेतील मेनरोडवर होणारी नित्याची वाहतुकीची कोंडी कायमची डोकेदुखी ठरली असून त्यावर वेळीच उपाययोजना करा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्याकडे करण्यात आली.# करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की  किमान दिवाळीच्या तोंडावर तरी वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा. वाहतूक संस्थांना जरी वेळ ठरवून दिली असली तरी या वेळेच्या अटीचा काही जणांकडून भंग होत आहे. अशांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.  दिवाळी सणाला वीट भट्टी परिसरात चार चाकी वाहनांना आत मध्ये प्रवेश बंदी असते, त्यामुळे ग्राहक त्याच परिसरात आपली खरेदी करून जातो, त्यामुळे रस्ता मोठा होऊनही बस स्टॉप  जवळील सर्वच मार्केटमधील दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी जात नाही, त्या परिसरातील दुकानांनाही मोठ्या रकमेचे भाडे अ

युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन.

Image
  युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन. युवासेना  कोल्हापूर(ठाकरे गट) यांच्या वतीने दीपावली निमित्त गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मंजित माने आणि युवासेना जिल्हा व शहर सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे आणि स्पर्धेसाठी १ रुपया फी असल्याचे युवासेना पदाधिकारी यांनी सांगितले. स्पर्धेचे नियम व अटी पुढीप्रमाणे- १)किल्ला मातीचा असावा.२)परीक्षकांचा निर्णय अखेरचा असेल.३)परीक्षक येण्याआधी गडकिल्या विषयी माहिती सांगणाऱ्या मावळ्यांनी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मावळ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. स्पर्धेमधे नोंदणी साठी संपर्क पुढीप्रमाणे- ८३०८६४५२५२,९३२५२९४९८९,९८८१८९९७५७,७३५०१६५२५४,८२०८५५५३१९

विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी मंदिर येथे भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे आयोजन. डॉ. आर डी ढाकणे.

Image
  विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी मंदिर येथे भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे आयोजन. डॉ. आर डी ढाकणे. ---------------------------------------- बीड:प्रतिनिधी -------------------------------------- गेल्या अनेक वर्षापासून राज्यांमध्ये सर्वसामान्य माणूस चिंतेत सापडला आहे. तरी सर्वांची चिंता दूर व्हावी यासाठी विश्वशांती व विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी चे मंदिर येथील भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे उद्दिष्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये विविध प्रकारच्या समस्या पहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या असो. की दुष्काळी परिस्थिती. विभक्त कुटुंबपद्धती गुन्हेगाराचे वाढते प्रमाण. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता. कुटुंबिक हिंसा वाढते प्रमाण. सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त जीवन जगत आहे. याच पार्श्वभूमीवर समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आत्मिक दिलासा मिळावा. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी प्रस्थापित व्हावी. त्याचबरोबर संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून श्री क्षेत्र दहिफळ वडमाऊली देवी मंदिर येथील भक्ती आराधना कार्यक्रमाचे

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता.   कै सुलाबाई गणपत जाधव रा. भणंग . यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले हनुमान उदय मंडळ भणंगचे माजी अध्यक्ष श्री सुजीत सुर्यकांत जाधव यांच्या आजी होत . त्या भणंग गावचे ग्राम दैवत श्री पाडळेश्वर देवाचे निशांत भक्त होत्या . त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी ,सुना , नातवंडे , नात सुना व परतुंडे आहेत. त्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत

कुंभी कासारीचे ७ लाख मे.टन उसाचे गाळप उदिष्ट - चंद्रदीप नरके.

Image
  कुंभी कासारीचे ७ लाख मे.टन उसाचे गाळप उदिष्ट - चंद्रदीप नरके. कुंभी कासारी साखर कारखान्याचा ६१ गळीत हंगाम शुभारंभ. यदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेने ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही मागील हंगामात दिलेला उच्चांकी ऊस दर, सवलतींच्या साखरेसह सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक तोडणी वहातुक टोळ्यांनी करारासाठी प्रतिसाद दिल्याने  २०२३/२४ चा हंगामात ७ लाख मे टन ऊस गाळप उदिष्ट पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.      कुंभी कासारी साखर कारखान्याचा ६१ गळीत हंगाम शुभारंभ अध्यक्ष माजी आ.चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.     यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले या हंगामात कारखान्याकडे ११ हजार २३७ हेक्टर उसाचे क्षेत्र नोंद आहे.कारखान्याकडे ऊसतोडणी वहातुकीला सभासद शेतकऱ्यांनी स्थानिक टोळ्यांचा करार करण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे.मागील हंगामातील संपूर्ण एफआरपी एकरक्कमी अदा केली आहे.यामुळे सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.    

कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

Image
  कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम. राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील संयुक्त तरुण मंडळाने चिंचमाई देवालय ते वरची गल्ली  असा अर्धा किलो मिटरचा रस्ता रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून सजविला होता. ही सजावट अत्यंत आकर्षक होती. निमित्त होते दसरा महोत्सवाचे, या वर्षीच्या पाटीलकीचे मानकरी बळवंत लहू पाटील यांच्याकडून कळस काढण्याचे कार्य झाले. परंपरेनुसार ग्रामदैवत चिंचमाईची पालखी सवाद्याच्या गजरात इरु दाजी पाटील यांच्या डाग या शेतात नेली जाते. या ठिकाणी देव पूजारी पाटील,मानकरी व नवरातकरी यांच्याकडून सोन्याच्या झाडाची विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर पालखी देवालयात परत आल्यावर  प्रांगणात गावकरी एकमेकांना आपट्याची पाने देऊन  सोने  वाटपाचा आनंद उत्सव साजरा करतात.  त्यानंतर देवालयात नऊ दिवस मुक्कामाला असणारे देवाचे मुखवटे कृष्णाजी गणपती पाटील, नारायण गुंडू पाटील व दिनकर विष्णू पाटील यांच्या घरी दिले जातात व पालखी गावात मुक्कामाला ठेवली जाते.

बोरगांव पोलीसांनी केली बेकायदेशीर धंद्यावर कारवाई घेतले दोघांना ताब्यात!

Image
  बोरगांव पोलीसांनी केली बेकायदेशीर धंद्यावर कारवाई घेतले दोघांना ताब्यात! बोरगांव पोलीसांनी बेकायदेशीर धंद्यावर करडी नजर ठेवत बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले बेकायदेशीर दारुची विक्री करताना पाडळी गावच्या हद्दीत मनोज बाळकृष्ण गायकवाड यास जुन्या साॅ मिल स्टॉपच्या पुला शेजारी असलेल्या आडोशाला  मुद्दे मालासह ताब्यात घेतले तर मौजे बोरगांव मधील बेघर वस्तीत पान टपरीच्या पाठीमागे कल्याण मटका घेत असताना सत्यवान बाळकृष्ण साळुंखे व व.40 यास ताब्यात घेतले बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तेलतुंबडे यांनी बेकायदेशीर धंद्यावर कठोर कारवाई केल्यामुळे महिला वर्गामधून त्यांचे कौतुक केलं जातं आहे.

जेतवन सामाजिक संस्था, जेतवन बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबई यांच्या वाटीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

Image
 जेतवन सामाजिक संस्था, जेतवन बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबई यांच्या वाटीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. ऐरोली :- जेतवन सामाजिक संस्था, जेतवान बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबईच्या वतीने 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.या मध्ये तीन गट तयार करून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी  भिकखू राहुलरत्न थेरो यांनी धम्म प्रवचन दिले. भीमशाहीर संगम कासारे यांनी बुद्ध भीम गिते गाऊन रसिकाणची मने जिंकली. या वेळी नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी रवि पी. ढवळे सर यांच्या आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेतवन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती होती.

गळफास घेऊन दोन तरुणांनी जीवन संपवले.

Image
   गळफास घेऊन दोन तरुणांनी जीवन संपवले. --------------------------------- दिंडनेर्ली : प्रतिनिधी  --------------------------------- गळफास घेवून दोन तरुणांनी आपले जीवन संपविले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकोंडी(ता.कागल) येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकाश विलास मातीवड्ड (वय २० वर्षे) असे त्या तरुणाचे नाव आहे.  याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नंदगाव गावच्या हद्दीतील दूधगंगा डाव्या कालव्या जवळ असलेल्या गैबी दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या शेतात आंब्याच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.याबाबत अनिल वडर यांनी इस्पुर्ली पोलिसांत फिर्याद दिली आहे.आकाश हा महाविद्यालयात शिकत होता तर त्याचे वडील उसाच्या ट्रॅक्टर वरती ड्रायव्हर म्हणून काम करीत होते त्याच्या पश्चात आई,वडील,बहीण,आजी असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आहे.       कुर्डू (ता.करवीर)येथील शुभम शिवाजी साठे (वय २३ वर्षे) याने कुर्डू गावातील चोरझरा या नावाने ओळखला जाणाऱ्या शेतात झाडाला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.शुभम हा एका खाजगी कंपनीत नोकरीस ह

अंबाबाई मंदिरात नऊ दिवस सीपीआरच्या आरोग्य टीमची सेवा.

Image
  अंबाबाई मंदिरात नऊ दिवस सीपीआरच्या आरोग्य टीमची सेवा.  नवरात्रोत्सवात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास तेथे सीपीआरची आरोग्य टीम तयार असते. ही टीम भाविकांवर प्राथमिक आरोग्य उपचार करून त्यांना औषध तसेच गोळ्या देत असतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीपीआर च्या प्रशासनाने यावर्षी उत्तम नियोजन केले होते. अनेक भाविक भक्तांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुग्णांना अस्वस्थ वाटल्यास ते या आरोग्य टीमला भेट देत होते. त्यानंतर आरोग्य टीम रुग्णांची ताप, थंडी, बीपी, शुगर इत्यादी तपासून त्यांच्यावर औषध उपचार करीत होते. या टीममध्ये कोल्हापूर शहरातील इतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा सहभाग दर्शवला.त्यामुळे या टीमचे भाविकांमध्ये कौतुक होताना दिसले. गेले नऊ दिवस त्यांनी हा उपक्रम राबवून भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. अशी माहिती सीपीआरचे आरोग्यदूत बंटी सावंत यांनी  फ्रंट लाईन न्यूज माहाराष्ट् या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेल च्या  प्रतिनिधीशी बोलताना दिली .  चौ

आजचा युवक आणि व्यवसायिक दशा आणि आशा.

Image
  आजचा युवक आणि व्यवसायिक दशा आणि आशा. आजच युवक उच्च शिक्षण घेवून उच्च डिग्री घेत आहे परंतु त्यांनां अपेक्षित असणारी नोकरी आणि पगार मिळत नाही तेथे तेथे अपयश येत आहे . त्यामुळे आजची युवा पिढी चिंताग्रस्त बनत चालली आहे . ना हाताला काम - ना शेतमालास दाम यामुळे युवकांचे आर्थिक/सामाजिक जीवन नाकाम ! अशीच आजच्या युवकांची दशा झाली आहे . सद्यस्थितीत देशाची लोकसंख्या वाढत असली तरी झोपडपट्टी पासूनचे सर्वसामान्य लोक पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षण देत आहेत . सध्या शिक्षणाचा प्रस्फोट झाला असला तरी सर्वत्र  गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे . असे शिक्षण घेवूनही ना घरका ना  घाटका अशी अवस्था झाली आहे . बिकट परिस्थितीतून मुलांना शिक्षण देताना देत असताना भविष्यात सुखाचे दोन घास खायला मिळतील असे सामान्य पालकांचे स्वप्न असते . परंतु आजच्या राजकीय साठमारीत सामान्यांचा भ्रमनिरास झाला असून त्यांचे स्वप्न भंग होत आहे  . समाजकल्याणकरी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत व ते वंचित अपेक्षित राहत आहेत . सर्वसामान्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही म्हणून एखादा उद