जावळी तालुक्याचे जलनायक स्व.विजयराव मोकाशी यांच्या जयंती निमित्त बोंडारवाडी कृती समितीचा भव्य मेळावा.

 जावळी तालुक्याचे जलनायक स्व.विजयराव मोकाशी यांच्या जयंती निमित्त बोंडारवाडी कृती समितीचा भव्य मेळावा.


जावली ( सातारा ) केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यालयात मिटींग आयोजित करण्यात आली यावेळी मेळावा यशस्वी करण्याचे ठरले दि.२० सप्टेंबर रोजी स्व. विजयराव मोकाशी साहेब यांच्या जयंती निमित्त बोंडारवाडी धरण कृती समिती वतिने भव्य मेळाव्याचे अयोजन करण्यात आलेले आहे.

मेळाव्यास प्रमुख उपस्तीत डॉ. भारत पाटणकर साहेब अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल , खासदार , आजी माजी आमदार जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस अधीक्षक ,मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंचन विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता , जावळी तालुकातील प्रांत साहेब, तहसीलदार, गट विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी , तालुका कृषी अधिकारी , वनविभाग अधिकारी, महावितरण अधिकारी, सहयाक पोलीस निरक्षक  पोलीस स्टेशन मेढा, आरोग्य अधिकारी,आजी माजी सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व राजकीय पक्षीय नेते आणि ५४ गावातील सरपंच उपसरपंच सोसायटींचे चेअरमन ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थिती राहातील - अधिनाथ ओंबळे , राजूशेठ धनावडे ,नारायण धनावडे.

[धरणाचे ई टेंडर ( कंत्राटदार फायनल होणे ) दि. ३० जून पासून झाले नाही...३० जून पासून जवळ जवळ २ महिने होत आले तरी पण सर्वे चा कंत्राटदार फायनल नाही..दि.२०सप्टेंबर ला कंत्राटदर फायनल होऊन भूमिपूजन व्हावे असे कृती समितीला अपॆक्षित आहे...जर असे नाही झाले तर कृती समिती या बद्दल निर्णय घेऊन स्वतःची भूमिका मांडेल - वैभव ओंबळे ]

[कृती समिती या कार्यक्रमच्या निमित्ताने जावळी करियर अकॅडमी आणि शौर्य करियर अकॅडेमी तसेच भागातील शाळकरी मुलांचे या कार्यक्रमध्ये विशेष योगदान असेल... - श्रीरंग बैलकर ]

[ मुंबई, पुणे विभागातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे.... आनंदा जुनघरे , विनोद शिंगटे]

राजेंद्र जाधव , बजरंग चौधरी ,नारायण सुर्वेशेठ, एकनाथ सपकाळ , अशोक पार्टे , विलास शिर्के ,जितेंद्र कासुर्डे , जगन्नाथ पार्टे , जगन्नाथ जाधव , सुरेश कासुर्डे , जर्नादन मोरे ,उषा उबरकर , विद्या सुर्वे , सुद्धा चिकणे , धनश्री शेलार , कविता ओंबळे  ,विजय सपकाळ , दिपक मोरे , आनंदा ओंबळे महादेव जाधव , महादेव ओंबळे , बाजीराव ओंबळे , मेळावा यशस्वी होण्यासाठी गावोगावी गाठी भेटी घेऊन संपर्क साधून मेहनत घेत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.