जलजीवन योजनेत लाच घेतल्याप्रकरणी महिला अधिकारी जाळ्यात.

 जलजीवन योजनेत लाच घेतल्याप्रकरणी महिला अधिकारी जाळ्यात.

-----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

चंदगड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे ( रा.बेळगाव, मूळ गाव, कल्याण, मुंबई, जिल्हा ठाणे ) या महिला अभियंत्यांना २५ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून अटक केली आहे. जलजीवन योजनेच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.

अधिक माहिती अशी की, चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडी गावात जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून पाणी पुरवठा योजना सुधारिकरण करण्याचे काम एक ठेकेदाराने घेतले आहे. या कामाचे बील मंजूर केले म्हणून १२ लाखाचे ३ टक्के प्रमाणे ३३ हजार मागणी केली. तडजोडीअंती २५ हजारांची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारताना कांबळे यांना रंगेहात पकडण्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाला यश आले. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, संजीव बबर्गेकर, विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, पूनम पाटील यांनी कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.