टाकाऊ पासून टिकाऊ पर्यंत राधानगरी येथील नितीन काळे बेरे यांनी गणपती जवळ देखावा सादर केला आहे तो वरील व्हिडिओद्वारे सादर केला आहे.
टाकाऊ पासून टिकाऊ पर्यंत राधानगरी येथील नितीन काळे बेरे यांनी गणपती जवळ देखावा सादर केला आहे तो वरील व्हिडिओद्वारे सादर केला आहे.
राधानगरीत सजावट स्पर्धेत नितीन काळेबेरे प्रथम.
कै. रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट राधानगरी यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत नितीन काळेबेरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत टाकाऊ पासून टिकाऊ, ऑनलाईन मुळे १२ बलुतेदार यांचा व्यवसाय नष्ट होत चालला आहे.
याचा एक सुंदर संदेश, ५ फूट घोड्यावर बसलेली गौराई, १२ महिन्याचे १२ सण, मराठी परंपरा, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, टाकाऊ पासून टिकाऊ, संस्कृती जपण्याचा प्रयत्न,
पंढरी दर्शन - रिंगण सोहळा महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा तसेच आधुनिक आणि पारंपरिक संदेश देणारे फलक, भजन कीर्तन, फटाके, डॉल्बी मुक्त संदेश अशा विविध विषयांची मांडणी करण्यात आली
होती, यासाठी स्पर्धकांनी आपल्या कल्पनेतून टाकाऊ पासून टिकाऊ सर्व देखावे वाखाणण्यासारखे होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल - प्रथम क्रमांक - नितीन काळेबेरे (राधानगरी) , द्वितीय क्रमांक विभागून- मनोज परब (राधानगरी) , प्रशांत चौगले (कुडूत्री), तृतीय क्रमांक विभागून - पूर्वा/अपूर्वा तिरवडे (राधानगरी), धोंडीराम कारेकर (कासारवाडी), चतुर्थ क्रमांक विभागून - वैभव चौगले/अमर चौगले (कुडूत्री), पाचवा क्रमांक विभागून - समर्थ एकावडे (कासारवाडी), गुरू पवार (राधानगरी) यांना देण्यात आला.. उत्तेजनार्थ - दिलीप एकावडे, अथर्व टेपुगडे, अजिंक्य घुगरे, राहुल चौगले, अवधूत सुतार, पंकज सुतार, शिवाजी सुतार यांना देण्यात आला. या स्पर्धेचे १९ वे वर्ष चालू आहे.
एकूण ३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण- सुभाष चौगले (पत्रकार), विश्वास आरडे, प्रणित एकावडे, प्रसाद एकावडे यांनी केले..
Comments
Post a Comment