गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा: आपची मागणी.

 गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा: आपची मागणी.

जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

पोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरला सुद्धा मारहाण केली, मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला. आम आदमी पार्टी या घटनेचा जाहीर निषेध करत प्रशासनाला निवेदन देत मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या घटनेची सखोल चौकशी करून अत्याचार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई व आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणीही आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली. 

तहसीलदार संजय मधाळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आप'चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, उषा वडर, मोईन मोकाशी, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, शशांक लोखंडे, किशोर खाडे, समीर लतीफ आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.