अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर येथील चौघांवर गुन्हा दाखल.
अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर येथील चौघांवर गुन्हा दाखल.
अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या कुटुंबीयांना कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी रामनगर तालुका सातारा येथील चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोहन बाळु लष्कर , किरण मिठापुरे , काशिनाथ पांचंगे,ऱओहन मोहन पवार, अशी संशयितांची नावे आहेत. रोहन लष्कर याने एका अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देत होता. याच कारणावरून रोहन लष्कर याने साथीदारांसह दिनांक ३० ऑगस्ट रोजी घरात घुसून त्या युवतीच्या कुंटुबातील काही जणांना मारहाण सुद्धा केली होती. युवतीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक अनिता मेणकर या तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment