पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे मद्यधुंद डॉक्टर कडुन रुग्णावर उपचार, पोलिसांनी घेतले ताब्यात.
पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे मद्यधुंद डॉक्टर कडुन रुग्णावर उपचार, पोलिसांनी घेतले ताब्यात.
----------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
किरण अडागळे.
-------------------------------------
पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत डॉक्टर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ अरुण जाधव हे वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत रुग्णावर उपचार करत असल्याचा प्रकार गुरुवारी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री घडला.संबंधित डॉक्टरला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली त्यावेळी डॉ.जाधव हे मद्यपान करून उपचार करत असल्याचे आढळून आले. याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांना पाठविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील २० ते २५ गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. सर्व सुविधा उपलब्ध असल्याने नेहमीच या रुग्णालयात गर्दी असते. दिवसभरात साधारण १५० ते२०० रुग्ण तपासणी केली जाते. गेली काही दिवस वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे. परंतु दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये डॉ अरुण जाधव हे एक अधिकारी काम पाहतात. रुग्णालयात असताना नेहमीच डॉ. जाधव हे मद्यपान करून असतात अशी चर्चा आहे. मात्र यापूर्वी कोणी तक्रार केली नाही. गुरुवारी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री पिंपोडे बुद्रुक येथील एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. त्यातील जखमींना प्रथमोपचार करण्यासाठी रुग्णालयात नातेवाईक घेऊन आले होते.परंतु उपचार करण्यासाठी आलेले डॉ. अरुण जाधव यांनी मद्यपान केले होते म्हणून नातेवाईकांनी जखमींना इतरत्र हलवले. यानंतर एक युवक उपचारासाठी रुग्णालयात आला असता डॉ. अरुण जाधव यांनी दारू पिल्याचे त्या युवकाच्या लक्षात आले. यावेळी त्या युवकाने डॉक्टरांना मद्यपान केले का असा प्रश्न केला असता डॉक्टरांनी हो म्हणुन उत्तर दिले.. त्यामुळे संबंधित युवकाने उपचार करून घेण्यासाठी नकार दिला. या युवकाने यानंतर गावातील काही लोकांना फोन करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी वाठार पोलिसांना संपर्क साधुन डॉक्टरांना पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी डॉक्टराची वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये डॉक्टरांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. याबाबत सरपंच डॉ. दिपीका लेंभे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रूग्णालयात प्रसुती साठी दाखल होणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या सोबत रुग्णालयात नातेवाईक ही असतात. मद्यधुंद अवस्थेत रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून कोणतीही अश्लील घटना घडू शकते त्यामुळे अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयात पुन्हा कामावर हजर होऊ देणार नाही.
Comments
Post a Comment