पाच लाख मेट्रिक टन गाळप उद्दिष्ट त्याच बरोबर कार्यक्षेत्र ही वाढवणार - चेअरमन -अमल महाडिक.
पाच लाख मेट्रिक टन गाळप उद्दिष्ट त्याच बरोबर कार्यक्षेत्र ही वाढवणार - चेअरमन -अमल महाडिक.
-----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापूर या संस्थेची सन 2022-23 या सालची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक असे म्हणाले की,कारखाना कार्यक्षेत्रामध्ये वाढीव गावे समाविष्ट करणात आहे,तसेच चालू वर्षी 5 लाख मेट्रिक टनाचे गाळपाचे उद्दिष्ट आहे.कारखान्यास शासकीय जागा उपलब्ध झाल्यास स्वमलकीचा इथेनॉल प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभेमध्ये सभेपुढील विषय व आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.सभेपुढील सर्व विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी केले.याला सभासदांनी बहुमताने हात वर करून मंजुरी दिली.शेवटी आभार कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांनी मानले,वंदे मातरम घेऊन सभेची सांगता झाली.यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन नारायण चव्हाण व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.तसेच सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment