माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चदवाणी यांच्यावर जिवघेणा हल्ला.

 माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चदवाणी यांच्यावर जिवघेणा हल्ला.

वळीवडे येथील बेकायदेशीर बांधकामावर गेलेल्या माहिती अधिकारी कार्यकर्ते अशोक हादुमल चंदवानी यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला असून त्यांच्या डोक्यावर वर्मी घाव झाल्याने त्यांना कोल्हापुरातील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 या घटनेची पार्श्वभूमी अशी की, करवीर तालुक्यातील वळीवडे येथील रि.स नंबर 147/3 मध्ये नितेश रामचंद्र डेबानी,अजय खानचंद डेबानी आणि अमित खाणचंद डेबानी यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू केलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार ओंकार उदय गायकवाड यांच्यासह तिघांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण तक्रार केली होती. त्याचबरोबर कोल्हापुरातील सातवे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात ही दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे क्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिनांक 25 रोजी बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थितीचा पंचनामा करून नोटीस बजावली होती.  याबाबत आज मंगळवार दिनांक 26 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक हदुमल चंदवानी हे वळीवडे हद्दीतील बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करणे साठी गेले असता,भगवान श्रीपती पळशे उदय जगदाळे,किशोर जगदाळे,  गोपाळ महादेव माने, नितेश रामचंद डेंबाणी,  अजय खानचंद डेंबाणी,अमित खानचंद डेंबाणी, यांनी धक्का बुक्की करत, शिवी घाळ करत मारहाण केली. तर गोपाळ माने आणि विजय  जगदाळे यांनी चांदवानी यांचे हात धरले तर भगवान पळसे यांनी  चंदवानी यांच्या डोक्यात खोरे घातल्याने ते गंभीर जखमी झाले असल्याची तक्रार फिर्यादी अशोक चंदवानी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.  अशोक चंदवानी यांच्यावर  गांधीनगर वसाहत रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे.  या घटनेची नोंद रात्री उशिरा गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.यातील चारही आरोपींना गांधीनगर पोलीसांनी अटक केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.