भजन किर्तनात रमले कण्हेरचे बाप्पा.
भजन किर्तनात रमले कण्हेरचे बाप्पा.
अनंत चतुर्दशीच्या बाप्पाची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक कण्हेर ता . जि .सातारा येथील नव जवान मंडळ कण्हेर , नेहरू युवा मंडळ कण्हेर आणि बौद्ध उत्कृष्ठ मंडळ कण्हेर या सर्व मंडळांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती शासनाच्या नियमानुसार कार्यक्रम अयोजित केला . मा पंचायत सभापति .तात्या साहेब वाघमुळे यांच्या नेतृत्वा खाली सर्व कार्यक्रम उकृष्ठ पणे पार पडले
महाराष्ट्र ही संताची भूमि आहे सर्व संताची शिकवन अंगी बाळगून तात्यासाहेब वाघमळे यांच्या नेतृत्वा खाली भजन किर्तन व मृदुंगाच्या तालात व टाळाच्या गजरात शांत व शिस्त पणे " श्री " ची विसर्जन मिरवणूकीत तरुण युवा वर्ग ' युवती , महिला यांचा सहभाग म्हणजे संताची शिकवण , महाराष्ट्राची शान व तात्या साहेबाचे नेतृत्व म्हणजे संताची पाऊलेच कण्हेर गावाला लागली असाच भास गणेश भक्तांना होत होता .
Comments
Post a Comment