शेतकऱ्यांना पुरेशी वीज द्या- करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)

 शेतकऱ्यांना पुरेशी वीज द्या- करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)


बळीराजा हा देशाचा कणा मानला जातो. आणि सध्या शेतकरी राजा आपल्या वाळत असलेल्या पिकांकडे पाहत बसला आहे. पुर्वी शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी ८ तास विज मिळत होती. ऑगस्ट महिन्यांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ज्याची विहीर व बोरवेल आहे तो शेतीला पाणी पाजू शकतो पण विजच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोयाबीन, भुईमुग व इतर पिके वाळत असताना डोळया देखत पाहत बसण्याखेरीज शेतकऱ्याकडे कोणताही मार्ग नाही. शेतकरी तर दिवस दिवसभर शेतातल्या लाईटच्या पेटी जवळच बसुन आहे. कधी लाईट येते व शेतीला पाणी पाजायचे अशा आशेने, कारण अधिकारीच विज कधी येणार सांगू शकत नाहीत. अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अशी उत्तरे दिली आहेत. महाराष्ट्र सरकार राज्यभर "शासन आपल्या दारी विज नाही शेतकऱ्यांच्या शेतावरी" अशी अवस्था महाराष्ट्र शासनाची झाली आहे. मोठ मोठ्या रक्कमा खर्च करून हया योजना राबवण्यापेक्षा शेतकऱ्यांना पुरेशी विज देण्यात यावी. तरी आपण शेती पंपाचे भारनियमन पुर्वीसारखे ठेवावे अन्यथा आपल्या विज वितरण खात्या विरोधात व महाराष्ट्र सरकार विरोधात आपल्या कार्यालयाच्या दारात बोंब मारून शासनाचा निषेध करण्यात येणार व विजे अभावी शेतामधील वाळलेली पिके अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्याचे आंदोलन अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येणार.

यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.यामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल असे भारनियमन करू नये अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू असा  इशारा राजू यादव यांनी दिला.

   या मागणीचे निवेदन वीज वितरण कार्यालय,उंचगाव चे सहाय्यक अभियंता मा. अमोल गायकवाड व हुपरी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता मा. दिगंबर पवार यांना देण्यात आले.

   यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रास होईल असे भारनियमन कमी करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

   यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकप्रमुख राहुल गिरुले, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवासेनेचे संतोष चौगुले,फेरीवाला संघटनेचे तालुकाप्रमुख कैलास जाधव,गुरुदेव माने, हिंदू ऐकताचे अमर जाधव, फेरीवाला संघटनेचे उपतालुकप्रमुख बाळासाहेब नलवडे, सचिन पोवार, अजित चव्हाण,आबा जाधव,शरद चव्हाण आदी शिवसैनिक व पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव सुभाष यादव, अनिल पाटील, सुरेश संकपाळ, अमर भोसले,भगवान घोरपडे, उत्तम खाडे, दिपक मुदुगडे, तेजस माळी, गोविंदा मुदुगडे, सुरेश मर्दाने, तानाजी माने, मुबारक सनदे, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.