मेढ्यामध्ये सकल मराठा समाजाकडून भ्याड हल्ल्याचा निषेध व कडकडीत बंद.

 मेढ्यामध्ये सकल मराठा समाजाकडून भ्याड हल्ल्याचा निषेध व कडकडीत बंद.


मराठ्याचा आई बहीनीच रक्त वाया जावू दिले जाणार नाही.

महाराष्ट्रातील जालन्याच्या संबड तालुक्यातील आनरबली सराटी गावातीले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण सुरु असताना पोलीसाकडून या शाततामय उपोषण सुरु असताना उपोषणाच्या ठिकाणी लाटी हल्ता करून मराठी समाजातील आई बहीणीच रक्त सांडले गेले . असल्याच्या निषेध करत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यानी या निंदणीय घटनेची जवाबदारी स्विकारून त्वरीत राजीनामा घावा अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाकडून मेढ्यातील छत्रपती चौकात करण्यात आली .

मराठा क्रांती मोर्चा सातारा यांनी सातारा जिल्हा बंदची हाक दिल्याने जावली तालुक्यात मुख्य ठिकाण मेढा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला . मेढा यातील सर्व व्यापार्यानी या हाकेस सात दिली .

सकल मराठा समाजा .मेढ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ऐकत्र येवून मोर्चा वेण्णा चौकातून पदयात्रा करत परत आला एक मराठा लाख मराठा ' आरक्षण आमच्या हककाच नाही कुणाच्या बापाच या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला

दरम्यान मेढा व जावली भागात मराठा क्रांती मोर्च्याच्या पाश्वभूमीवर मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरक्षक संतोष तासगावकर यांच्याकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.