मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.
मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.
करवीर तालुक्यातील कोथळी गावामध्ये अस्मिता केदारी चौगुले या विवाहितेला दोन मुली झाल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की मयत अस्मिता हिला दोन मुली झाल्या आहेत दोन मुली झाल्याच्या कारणावरून पती सासू-सासरा यांनी विवाहितेला तू वांझोटी असतीस तर बरं झालं असतं, या प्रकारचे आणि अन्य मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संबंधित विवाहितेच्या वडिलांनी दगडू सदाशिव यादव राहणार ,केकतवाडी, पुलाची शिरोली यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित विवाहितेच्या सासू-सासरे आणि पतीला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सासरच्या लोकांच्या ज्याचास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. तसेच सासरच्या लोकांविषयी कमालीची चीड असून गावातील परिस्थिती तणावपूर्ण आहे.
Comments
Post a Comment